डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन, म्हणून साजरा.
मोहोळ तालुका प्रतिनिधी/बापुसाहेब घळके
अनगर (तालुका मोहोळ) येथील अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून कै.शं.बा.पाटील विद्यालय अनगर तालुका मोहोळ येथे संस्थेचे सचिव अजिंक्यराणा राजन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ शंकर नवले सर उपस्थित होते. शिक्षक दिना निमित्त एकुण 250 शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी यांना उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य चंद्रकांत ढोले सर, प्राचार्य डॉ.चंद्रकांत सुर्यवंशी मुख्याध्यापक संजय डोंगरे उप मुख्याध्यापक महादेव चोपडे,पर्यवेक्षक माधव खरात,विश्वजित लटके, सिताराम बोराडे, शिवाजी मोटे, शशीकला कोष्टी मॅडम, संभाजी बोडके, संस्थेचे संचालक,लहू निरगिडे, किरण गुंड, दत्तात्रेय थिटे,प्रगतशील शेतकरी सुनिल घाटुळे, माजी सरपंच अंकुश गुंड. आदी मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post