वार्ताहर प्रशांत माने : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ पतसंस्थेच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.मंचर – सहकारी पतसंस्था व सहकारी बँका यांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी सहकार खात्याचे तालुका सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून १०१ चा दाखला व त्यानंतर जप्ती प्रक्रीयेसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी या कामासाठी तब्बल दोन वर्ष कालावधी जातो. त्यामुळे कर्जदार कर्ज भरण्यास टाळाटाळ करतो. परिणामतः संस्थेच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन थकबाकी कर्ज वसुलीची प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण झाली पाहिजे. असा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे.’ असे राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ पतसंस्थेच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, संचालिका कल्पना आढळराव पाटील, अक्षय आढळराव पाटील, उपाध्यक्ष सागर काजळे, महेश ढमढेरे, योगेश बाणखेले, हनुमंत तागड, शोभा आवटे, अभिमन्यू लांडगे, राम तोडकर, भिकाजी बोकड, अशोक गव्हाणे, रामदास पवळे उपस्थित होते.शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ‘भैरवनाथ पतसंस्थेने गेल्या ३५ वर्षात सामाजिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. एकूण १४ शाखा असून लवकरच लांडेवाडी येथे प्रशस्त इमारत, जुन्नर, राजगुरूनगर व ठाणे शाखा सुरू करणार आहोत.योगेश बाणखेले, हनुमंत तागड, शोभा आवटे, अभिमन्यू लांडगे, राम तोडकर, भिकाजी बोकड, अशोक गव्हाणे, रामदास पवळे उपस्थित होते.शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ‘भैरवनाथ पतसंस्थेने गेल्या ३५ वर्षात सामाजिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. एकूण १४ शाखा असून लवकरच लांडेवाडी येथे प्रशस्त इमारत, जुन्नर, राजगुरूनगर व ठाणे येथे शाखा सुरु करणार आहे.सागर काजळे म्हणाले, ‘पतसंस्थेचे भागभांडवल पाच कोटी ३६ लाख २७ हजार रुपये असुन ४३५ कोटी एक लाख ६२ हजार रुपये ठेवी आहेत. ३३८ कोटी २९ लाख रुपये ३८ हजार कर्जवाटप केले असून नफा सहा कोटी २७ लाख ९६ हजार रुपये झाला आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे.’ उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले. महेश ढमढेरे यांनी आभार मानले.
Discussion about this post