दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी असून गेल्या दहा वर्षापासून आरोग्यविषयक काम करत आहे असे सांगितले.
ते दौंड तालुक्यातील चौफुला येथील बोरमलनाथ मंदिर येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात बोलत होते. यावेळी आमदार राहुल दादा कुल म्हटले की स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांच्या विचारांच्या वारसा पुढे चालवताना दौंड तालुक्याचा आमदार झाल्यापासून गेल्या दहा वर्षापासून आरोग्य विषयक कामे करत आहे.
कोरोना काळातही भरपूर प्रमाणात काम केले आहे परंतु कुठे याची प्रसिद्धी केली नाही .या शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करून योग्य ते उपचार त्यांना देण्यात येतील असे आश्वासन राहुल दादा यांनी दिले.
या शिबिरात जवळपास 13800 रुग्णांची नोंद व तपासणी झाली असून तपासणी ते पूर्ण उपचार अशा प्रकारचे हे शिबिर आहे. पुण्यातील 50 फुल अधिक नामांकित हॉस्पिटलने यामध्ये सहभाग घेतला होता.
सुमारे 3000 पेक्षा जास्त अधिक चष्मे वाटप करण्यात आले 800 पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना आवश्यक ते साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर दीपक जाधव यांनी केले यावेळी माजी आमदार रंजनाताई कुल कंचन कुल ,
भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर ,प्रेमसुख कटारिया, धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, प्रांत मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके,
उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस आदी मान्यवर या शिबिराच्या वेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे दौंड तालुका अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांनी केले व आभार उमेश देवकर यांनी मांडले..
Discussion about this post