प्रतिनिधी: सुधीर घाटाळ
डहाणू, गंजाड येथे दि.१९ सप्टेंबर, रोजी जि.प.शाळा गंजाड येथे इयत्ता नववी साठी नवीन वर्गाचे उद्घाटन समारंभ माननीय सरपंच अभिजीत देसक यांच्या उपस्थित संपन्न झाला. या प्रसंगी विस्तार अधिकारी सोनू सिंग पाटील, प्रभारी केंद्र प्रमुख शेळके सर, गावचे पोलीस पाटील कमळाकर गुजर, प्रभारी मुख्याध्यापक धोडी सर, सामाजिक कार्यकर्ते संजीव धिंडे, शाळा व्यवस्थापन समिती, परिसरातील शिक्षक वृंद, आठवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच परिसरातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या पाहुण्यांचे साल व श्रीफळ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.
पालघर जिल्ह्यातून डहाणू तालुक्यातील ७ शाळांना मंजुरी मिळाली. त्या पैकी एक जि.प.गंजाड शाळेची निवड करण्यात झाली.वर्गा अभावी बऱ्याच मुलांना प्रवेशा साठी कसरत करावी लागत होती. आणि शाळेत जाण्यापेक्षा घरी राहणे पसंत करत होते. त्याचे कारण म्हणजे पुढील वर्ग नाही, शाळा जवळ नाही, शाळेची पट संख्या मर्यादित असल्यामुळे 9 वी इयत्ते साठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे लांब चा प्रवास करणे सोईस्कर नव्हते, विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती त्यामानाने वर्ग कमी होते.
मागील अनेक वर्षांपासून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा वर्ग मिळत नव्हते.परंतु उशिरा का ?होईना शासनाने याची दखल घेऊन नवीन वर्गांना मान्यता दिल्यामुळे समाजामध्ये व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.या मुळे भविष्यात जास्तीत जास्त मुलांना जवळपासच्या ठिकाणी शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.त्यामुळे विद्यार्थ्यांची गैर सोय होणार नाही.
Discussion about this post