कुठलाच शैक्षणिक वारसा नसतानाही जिद्द आणि चिकाटी व समाजाचे काहीतरी देने लागतो या भावनेतून सेवक ते मुख्याध्यापक व संस्थाचालक पदा पर्यंत थक्क करणारा प्रवास आदर्श मुख्याध्यापक श्री आनीलजी विरभान पवार साहेब यांचा आदर्श होत आहे .
यशोगाथा उदगीर तालुक्यातील मल्लापुर तांडा येतील विरभान मामा आश्रम शाळे मध्ये 1988 साली श्री अनिल पवार हे सेवक म्हणून रुजू झाले,त्या नंतर मुक्त विद्यापीठाचे शिक्षण चालवू ठेवत शिक्षण पूर्ण करत 1991 साली वसतिगृह अधीक्षक म्हणून त्यांची बढती झाली,त्या नंतर त्याच्यातील विद्यार्थी वृती शांत बसून न देता त्यांनी पुढील शिक्षण चालू ठेवले,व 12वि नंतर पत्रा द्वारे अध्यापक पदवीला पूर्ण ,1995 साली ज्या शेळेत सेवक म्हणून रुजू झाले.
त्याच शेळेत शिक्षक म्हणून कार्य सुरू झाले ,त्या नंतर 2004 ला मुख्याध्यापक या पदावर रुजू होत कार्यभार सांभाळला श्री अनिल पवार यांच्या सेवक ते मुख्याध्यापक या प्रवासा दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विषेश प्रयत्न केले त्यांची अनेक विद्यार्थी आज प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत, सामाजिक जाणिवेतून अनेक अनाथ व गरिब मुलीचे लग्न व शिक्षणासाठी मदत करण्याचे काम अनिल पवार यांनी केले ,2016 साली श्री अनिल पवार साहेब यांनी मातोश्री पणाई सेवाभावी शिक्षण संस्था स्थापन करून या संस्थेच्या मध्येमातून बुद्ध वाशी हौसाबाई आठवले प्राथमिक आश्रम शाळा,नरेंद्र बाबूराव पावर कनिष्ठ महाविद्यालय नागलगाव, मातोश्री रुक्मिणीमाता भालेराव अस्तिवेंग मुलीचे निवासी विद्यालय उदगीर,आरती पवार दिव्यंग विद्यालय नागलगाव ,लक्ष्मी पवार प्राथमिक व माध्यमिक अधिवासी आश्रम शाळा मुक्रमाबाद, तसेच बाळ भगवान अपंग निवासी विद्यालय देवणी,अशा अनेक शाळांचा कार्यभार संस्था चालक नाथ्याने शैक्षणिक कार्य चालू आहे .
तसेच त्याबद्दल बाळ भगवान अपंग निवासी विद्यालय देवणी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने संस्थापक गुरुवर्य श्री आनीलजी विरभान पवार साहेब यांचा शिक्षकदिनी विशेष सत्कार उदगीर येथे करण्यात आलाप्रतिनिधी :-दीपक व्यंकटराव पाटील मो:-9823752367
Discussion about this post