भिवंडी मध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्या कारणाने सर्व विद्यार्थी चक्क रस्त्यावर शाळा भरवत उतरले आहेत. विद्यार्थ्यांची शाळा दुपारी साडे बारा च्या सुमारास भरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी दहा मिनिटांच्या अंतरावर एक ते दोन तासाची कसरत करावी लागत आहे तसेच त्या रस्त्याच्या दिशेने दापोडे, पूर्णा येथील इंडस्ट्रीयल भागा मुळे तेथील ट्रान्सपोर्ट च्या गाड्यांची संख्या अती प्रमाणात वाढल्या मुळे देखील वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे म्हणून वाहतुकीतून लवकरात लवकर सुटका व्हावी असा इशारा विद्यार्थी आणि भिवंडीतील नागरिकांनी प्रशासनाला सादर केला आहे.
Discussion about this post