महसूल विभागाचे इ -पिकपाहणी अँप नाही करत काम _
ता. प्रतिनिधी -देविदास वायाळ
शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये पेरलेल्या पिकांचा पिकपेरा भरण्यासाठी महसूल विभागाने इ -पिकपाहानी अँप सुरु केलेले आहे.आणि पीकपाहणी ही अँड्रॉइड मोबाईल द्वारे करावी लागते परंतु प्रत्येक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल राहत नाही आणि काही प्रौढ शेतकऱ्यांना तर मोबाईलच समजत नाही मग त्या शेतकऱ्यांनी करायचे तरी काय असा प्रश्न निर्माण होतो. व त्या शेतकऱ्यांना शासकीय अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. आणि चालू खरीप हंगामामध्ये 1 ऑगस्ट 2024 पासून इ – पिकपाहानी अँप द्वारे पिकपेरा भरणे सुरु झाले असून 15 ऑगस्ट 2024 ला शेवटची तारीख आहे परंतु अँपमध्ये इ -पिकपाहानी मध्ये पिकपेरा भरताना अँपचे सर्व्हर सुरळीत चालत नाही तर काही ठिकाणी लोकेशन वर साक्षात हजर असतांना सुद्धा लोकेशन कॅमेरा असं दाखवत आहे कि तुम्ही तुमच्या गट क्र. पासून काही मीटर दूर आहात. पूर्ण गटात जरी शेतकरी फिरला तरी लोकेशन कॅमेरा लाईव फोटो घेत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. इ -पिकपाहानी जर वेळेवर झाली नाही तर शेतकऱ्यांना शासकीय अनुदानापासून आणि पीक विम्यापासून वंचित राहावे लागू शकते. करिता शासनाने काही प्रमाणात ज्या शेतकऱ्यांना इ -पिकपाहानी ऑनलाईन भरता येत नाही त्यांचा पिकपेरा ऑफलाईन पद्धतीने भरून घ्यावा. जेणेकरून कोणताही शेतकरी पिकपेरा न भरला गेल्यामुळे शासकीय लाभपासून वंचित राहू नये.
Discussion about this post