अक्षरशः पिकाची राख रांगोळी झाली! शेतकरी प्रचंड मोठ्या संकटातून जात आहे. मा. आदित्यसाहेबांना मतदारसंघात झालेले नुकसान गावोगावी पोहचून दाखवले. हे नुकसान पाहून तेही व्यथीत झाले. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. तुम्हा सर्वांची ही अवस्था सरकारच्या कानावर सरकारला खडबडून जागे करण्यासाठी भाग पाडू!
सरसकट नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी ताकदीने शिवसेना उभी राहील. रस्त्यावर यावं लागलं तरी आम्ही त्यासाठी कमी करणार नाही. पडझड झालेल्या घरांची, वाहून गेलेल्या जनावरांची पाहणी त्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांचा छाती पिळवटून टाकणारा आक्रोश, त्यांची गाऱ्हाणी ऐकली. परभणी जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सरसकट नुकसान भरपाई मिळवून देऊ, असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.


Discussion about this post