शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी.
नितेश झांबरे
डिग्रस (ता.उदगीर) येथील रहिवाशी असून सुमठाणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर, मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले तुकाराम माधव पडोळे यांना तालुका स्तरावरील २०२४-२५ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
याबाबत तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र दिले आहे.याबदल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुमठाणा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी केंद्र प्रमुख दामाजी बालुरे, सहशिक्षक दिपक बिराजदार, बालाजी नरहरे राजीव जाधव ,भिमराव रकसाळे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य आदी उपस्थित होते.
Discussion about this post