एक भावकी एक गणपती
चाहुल लागता तुझ्या आगमनाची ,
हिरवा शालू नेसुनी तयारी स्वागताची ,
तेहतिस कोटीदेव पांढय्राशुभ्र पूष्पांनी वर्षाव करती.
रत्नागिरी तालुक्यात एका खेडेगावात प्रसिद्ध असलेली गजाननाची शंभर वर्षापूर्वीची परंपरा..
भक्तांच्या हाकेला आणि नवसाला पावणारा हा गणपती कांबळेलावगण गावचा आठघराण्याचा राजा म्हणुन ओळखला जातो. या गणपतीची ख्याति म्हणजे पूर्वी या वाडीमध्ये आठ घरे होती तर आठघरे मिळून एकच गणेशाची मूर्ती आणायचे आणि कार्यक्रम करायचे आता या धावपळीच्या जगात या आठघरांची २१घरे झालीत तरीही एक भावकी एक गणपती हि पूर्वीची परंपरा अजुनही चालु आहे. माझ्या या लाडक्या गणरायाची मूर्ती पुर्वीपासून सिंहासनामधे डोक्याला फेटा बांधून बसलेली असते. भाद्रपदशुध्द चतुर्थीच्या दिवशी लहान थोर भक्तांच्या हजेरीत गणरायाला वाजत गाजत स्वागत होते.
नंतर आमच्या वाडीचे गावकर दीपक कृष्णा बलेकर यांच़्या घरी कूलस्वामीनीच्या बाजूलाच बसविण्यात येते नंतर बाप्पाची आरती करून प्रत्येक घरातुन २१मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. सायंकाळी ७वा बाप्पाची पूजा करून आरती करण्यात येते.
अजून एक या गणरायाची खासीयत आहे की ज्या दिवशी गौरी मातेचे आगमन होते त्या दिवशी या बाप्पाला देवरूम मधून मखरात बसवण्याची प्रथा आहे.
या गणरायाच्या दर्शनासाठी बाहेरून भक्तगण येत असतात हा बाप्पा भक्तांच्या नवसाला पावणारा आहे हाकेला धावणारा आहे.
गौरी पुजनाच्या दिवशी महिला मंडळ विहीरीवरुन गौरी वाजत गाजत आणुन गौरीमातेला आरास सजवून आणि गणपती बाप्पाला मखरात बसवण्यात येते. सर्व मंडळी एकत्र गौरी माता आणि गणपती बाप्पाला एकत्र पाहुन मन इतक मोहुन जाते की लेखन करणाऱ्याची लेखणी कमी पडेल.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचे हौशे भरत असताना जेवढी महीलांची गर्दी असते तेवढीच त्या हौशातील वाण घेण्यासाठी पुरुषांची गर्दी असते. हौशे वाटप झाल्यानंतर गणेशाला दहीभाताचा तर गौरीला वडे मटणाचा नैवेद्य प्रत्येक घरातुन आणुन दाखवण्यात येतो.
मग पाचव्या
दिवशी विर्सजनाचा दीवस त़्या दीवशी गणेशाची आरती करून गणपती बाप्पासमोर नवस बोलण्याची एक परंपरा आहे सगळ्या घरातुन गणपती बाप्पासमोर आपली सूखदूखे नवसातुन सा़ंगण्याचा प्रयत्न करत असतात.नंतर गणपतीला ढोल ताषांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जल्लोषात गणरायाला निरोप देण्यात येतो.
पत्ता- दिपक कृष्णा बलेकर, साई ज्योत सदन, आठघराणे बलेकर वाडी, मुं.कांबळे लावगण, पोस्ट.सैतवडे, (खंडाळा) ता.जि. रत्नागिरी. ४१५६१३
Discussion about this post