आज दि.8 रोजी दिंडोरी येथे कोळी महासंघाच्या मिटींगसाठी उपस्थित असलेले विधानपरिषद आमदार तथा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.रमेश दादा पाटील यांच्या हस्ते जयराम बदादे यांना त्र्यंबकेश्वर विद्यार्थी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
तसेच शिक्षण ,रस्ते,आरोग्य, रोजगार आदिवासी भागातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली, आदिवासी भागात आजही मुलभूत सोईसुविधा मिळाल्या नाहीत, आजही आदिवासी समाज विकासापासून वंचित राहिलेला आहे,
मात्र संघटनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार व जास्तीत जास्त संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार,व सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार असे मत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गुलाब गांगुर्डे, अशोक लांघे, विष्णू बेंडकोळी, नाशिक शहर अध्यक्ष संतोष बोके, भगिरथ कचरे, नाशिक महिला जिल्हाध्यक्षा सविता ताई गायकवाड,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post