ऐतिहासिक स्फूर्तीस्थळांचे जतन व संवर्धनासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते सुहास राजेशिर्के यांचे उपोषण
क्रांती घरात बसून होत नसते. आजवर आरक्षणासाठी मराठ्यांनी हजारो आंदोलने केली. आपल्या न्याय्य हक्कासाठी गेल्या वर्षभरात लोकशाही मार्गाने मराठा बांधवअनेकदा रस्त्यावर उतरला. मात्र सरकारने हजारो तरुण आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे आंदोलन करायचे की नाही असा प्रश्न समोर उभा राहातो. वास्तविक जेव्हा केव्हा गुन्हे दाखल होतात अशावेळी आंदोलकांना कायदेशीर मदत मिळणे गरजेचे असते. अनेक वकील बांधव सहकार्य देत असतात. सुप्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कायदातज्ञ सतीश मानशिंदे हे तर तत्परतेने आंदोलकांच्या बाजूने मैदानात उतरतात. अर्थातच यामुळे आंदोलकंनाही मोठा आधार मिळून जातो.
अलिकडे तर सर्वोच्च न्यायालय दिल्ली, मुंबई उच्च न्यायालय, संभाजीनगर खंडपीठ व नागपूर खंडपीठ येथे फक्त एक रुपया फी घेऊन स्वखर्चाने कायदेशीर मदत देण्याचे मानशिंदे यांनी जाहीर करून टाकले आहे.या एकूण पार्श्वभूमीवर अलिकडच्या दीड दोन वर्षात महाराष्ट्रभरात सुहास राजेशिर्के हे एक नाव कमालीचे चर्चेत आहे. मराठा आंदोलनाच्या चळवळीबरोबरच ते छत्रपती सभांजी महाराज आणि स्वराज्याच्या कूलमुखत्यार महाराणी येसुबाईंच्यास्फूर्तीस्थळांच्या विकासासाठी अहोरात्र झटताना दिसताहेत. यापूर्वी सुहास राजेशिर्के यांनी ‘स्वराज्यरजक संभाजी महाराज’ या मालिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर उठवलेले वादळ, तसेच सातारा शहरातील सार्वजनिक वाचनालयाला श्रीमंत थोरले प्रतापसिंह महाराज यांचे नाव देण्यासाठी उभारलेला लढा आणि मिळवलेले यश सर्वत्र चर्चेचे ठरले.
कोण आहेत सुहास राजे शिर्के?
— सुहास राजेशिर्के मूळचे कोकणातिल वेहेळे( भेले )गावातिल आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कोकणात झाले. पुढचा शैक्षणिक प्रवास हा ऐतिहासिक सातारा नगरीत झाला. याच ऐतिहासिक सातारा नगरीच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी त्याची आपल्या कार्याने विशेष अशी ओळख निर्माण केली. पुढे त्याचे इतिहासाच्या पाऊलखूणा शोधण्यासाठी ते कटिबध्द झाले. दीड दोन वर्षांची अधक शोधमोहीम करून अखेर त्यांनी श्रीमंत महाराणी येसुबाईं यांच्या संगम माहुली येथील समाधीचा शोधा लावला. सरकारने या शोधमोहिमेची दखल घेऊन सदर समाधीशिल्प राज्यसंराक्षित स्मारक म्हणून अधिसूचना काढण्याचा निर्णयही घेतला.
आता सुहास राजेशिर्के आपला मोर्चा महाराणी येसुबाईंचे माहेर शृगांरपुराकडे वळविला असून संगमेशवर – शृगांरपुरात महाराणी येसूबाई स्मृतीस्थळ उभारावे यासाठी त्यांची धाडपड सुरुंय. दि ५ एप्रिल २०२३ ला त्यांनी शासनाकडे तस प्रस्तावही पाठवला आहे. शृगांरपरचे लोकनियुक्त सरपंच सरपंच विनोद भिकाजी पवार यांनी मात्र सर्व सहकार्य करण्याचे वचन सुहास राजेशिर्के यांना दिले आहे.
आता याबाबतची सर्व कगद पत्रे शासन दरबारी जमा करणे, तसेच इतर सर्व ऐतिहासिक दस्ततावेज एकत्र करणे, उपलब्ध माहितीच्या आधारे विविध पातळ्याळर संशोधन करण्याचे काम वेगाने सुरू ठेवले आहे. एकंदरच छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबतीने महाराणी येसूबाई यांचा जाज्वल्य इतिहास युवा पिढीमध्ये रुजायला हवा हा एकमेव उद्देश समोर ठेवून सासरच्या आणि माहेरच्या ठिकाणावरील स्फूर्तीस्थळांचा विकास वेगाने व्हावा यासाठी सुहास राजेशिकै एक नवे स्वप्न घेऊन लढत आहेत.
Discussion about this post