राहू प्रतिनिधी-आपल्या दौंड तालुक्यातील कार्यरत असलेल्या सुमारे ८० मिनी अंगणवाडीचे नियमित मोठ्या अंगणवाडीमध्ये रुपांतर करण्यात आले असल्याची माहिती आमदार राहुल दादा कुल यांनी दिली.
यामुळे या ठिकाणी येणाऱ्या लहान मुलांना अजून चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. याकामी शासन दरबारी व विधानसभेत वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल सर्व अंगणवाडी सेविका ताई यांनी आमदार राहुल दादा कुल यांची राहू येथील निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर यांच्या विविध समस्याबाबत आपण पाठपुरावा करीत असून त्यांचे मानधन वाढविणे, कामाचे व्यवस्थापन करणे त्यांना शासकीय सेवेत नियमित करणे अशा विविध समस्या व मागण्यांची शासनाने दखल घ्यावी व सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी देखील आपला पाठपुरावा सुरु असून, भविष्यात देखील त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मदत केली जाईल असे आश्वासन दादांनी त्यांना दिले.
Discussion about this post