
पहाट फाउंडेशनतर्फे ‘पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ गोपाळ कळसकर यांना जाहीर..
भुसावळ (जळगांव) : पहाट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे दरवर्षी समाजकार्य, पत्रकारिता, शैक्षणिक, युवा उद्योजक, क्रीडा, साहित्य, कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणीजणांना पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते.
‘पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे होते’ या तत्वावर पहाट फाउंडेशन कार्य करीत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या हेतूने संस्था कार्यरत आहे.
पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ व उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन गोपाळकुमार चांगदेव कळसकर (आयुध निर्माणी वरणगांव) यांची यंदाच्या पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराकरीता पहाट फाउंडेशनतर्फे निवड करण्यात आली आहे. गोपाळकुमार कळसकर हे दैनिक बाळकडू प्रतिनिधी असून दैनिक योजना दर्पण, सारथी महाराष्ट्राचा अशा वृत्तपत्रांतून त्यांनी जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली असून ते झेप फाउंडेशन, पुणे या संस्थेचे जळगांव जिल्हा सचिव आहेत. येत्या १४ सप्टेंबर रोजी नांदापुरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर येथे सदर पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
सदर कार्यक्रमात मा.चैत्राम पवार (महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ), डॉ.जीवन राजपूत (जे जे प्लस हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर), मारुती म्हस्के (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय छ.संभाजीनगर) आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थीना सन्मानपत्र, मानाचा फेटा व ट्रोफी देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी, दंगलकार मा.नितीन चंदनशिवे, डॉ.पी एम शहापूरकर (प्राचार्य, डॉ. बा आं मराठवाडा विद्यापीठाचे समाजकार्य महाविद्यालय), प्रा.रमेश गावित (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,छ.संभाजीनगर), मा.दिलीप शिखरे (DIRECTOR,WE CAN WELFARE ASSOCIATION,PUNE), अर्पिता सुरडकर (संचालिका ,पहाट फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवींचे काव्यसंमेलन सादर होणार आहे. पुरस्कार्थी यांच्या या सन्मानाबद्दल त्यांच्यावर अनेक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर कार्यक्रमात बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व पहाट फाउंडेशन चे संचालक अमोल भिलांगे यांनी केले आहे.
Discussion about this post