लोहारा ता.पाचोरा दि.१४
ग्रामविकास मंत्री मा. ना.गिरीष भाऊ महाजन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर काळे, तालुकाध्यक्ष राहुल राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख शरद पांढरे, तालुका उपाध्यक्ष शांताराम बिल्होरे यांच्या उपस्थितीत लोहारा-कुऱ्हाड गट प्रमुख चंद्रकांत शांताराम पाटील तर लोहारा गण प्रमुख सुरेश भगवान गायकवाड, कुऱ्हाड गण प्रमुख अरुण श्रावण बोरसे तर
तालुका दिव्यांग अध्यक्षपदी सुरेश पाटील यांची
नियुक्ती गटातील म्हसास येथिल किसन पाटील यांच्या फार्म हाऊस येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या सोबत गटात येणाऱ्या २२ खेड्यातील गाव प्रमुखांची ही नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
लोहारा-उमेश देशमुख, कासमपुरा-आनंद मरमट, शाहपुरा-सुनील राजपूत, कळमसरा-रमेश पाटील, म्हसास-प्रवीण पाटील, रामेश्वर-सुरेश पवार,
लाख-लक्ष्मण वंजारी, कुऱ्हाड बुद्रुक तांडा- इंद्रजीत वंजारी, कुराड बुद्रुक- किरण पाटील, नाईक नगर- अंकुश चव्हाण,
कुऱ्हाड खुर्द- राहुल गायकवाड, सर्वे- सचिन सुरवाडे, जामने-अविनाश पाटील, आर्वे- हर्षल माळी, सांगवी-भगवान पाटील, साजगाव-अविनाश पाटील, बिल्दी- निलेश पाटील, खेडगाव- दत्तात्रेय पाटील, वेरूळी खुर्द- सचिन पाटील, वेरूळ बुद्रुक- गोरख भिल, गोराडखेडा खुर्द- भावेश चौधरी, गोराडखेडा बुद्रुक-अमोल पाटील, यांना नियुक्तीपत्र देऊन भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग गट/गण व गाव प्रमुखाचा पदभार दिला.
यावेळी तालुका अध्यक्ष राहुल राजपूत, गट, गणं, गाव प्रमुखांना म्हणाले की गावाचा विकास व जनतेची सेवा करण्याची ही संधी भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभागा मार्फत आपल्याला मिळाली आहे.
गटातील संघटन बळकटीसाठी भाजपा ज्येष्ठ नेते शरद सोनार, संजय शांताराम पाटील, संदीप राजपूत,
डॉ.प्रदीप महाजन, संजय उशिर, ईश्वर पाटील, जिभू हटकर,भाऊसाहेब कुमावत, रामचंद्र माळी, सुनिल क्षीरसागर , मनोज पाटील, विजय पाटील,शांताराम पाटील गोराडखेडा, प्रभावती शिंपी, भारती पाटील, विलास पाटील, सुनील पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. असे जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले.
यावेळी गटातील भाजपा नेते कैलास चौधरी, किसन पाटील, जगदीश तेली, नितीन गवळी, पितांबर पाटील, अशोक पाटील, कैलास कुमावत,बापू पाटील, अनिल तडवी, विशाल पवार, दिपक राजपूत, नंदू सुर्वे ई.उपस्थित होते.
नवीन दमाचे नवीन होतकरू कार्यकर्ते सोबत घेऊन, अधिकाऱ्यांचा पाठ पुरावा करून, शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत राहू. गाव, खेडे, वाड्या, वस्त्या,पाढे व तांडे समृद्ध व्हावे यासाठी भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग जळगाव कटिबद्ध राहील
हे भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या पदाधिकाऱ्यांच कर्तव्य आहे.
—चंद्रशेखर काळे——
भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग जिल्हा (संयोजक) अध्यक्ष जळगाव
Discussion about this post