पंचायत समिती लोणार चे गटशिक्षणाधिकारी आदरणीय जंगलसिंग राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर चव्हाण यांनी टिटवी केंद्रातील 3 शाळा वृक्षरोपण साठी दत्तक घेतलेल्या आहेत त्या मद्ये गोत्रा, सावरगाव मुंढे तांडा, तशेच मढी गोत्रा येथील शाळेत देखील त्यांनी हजारो झाड लावून त्यांचं संवर्धन ते करत आहेत, तशेच आता ते जिल्हा परिषद शाळा सावरगाव मुंढे तांडा येथील शाळेत वृक्ष रोपण करत आहेत.
काल दिनांक 14 / 09 / 2024 रोजी त्यांनी जिल्हा परिषद शाळा सावरगाव मुंढे तांडा येथे वृक्ष रोपण केले तेथील मुख्याध्यापिका आदरणीय लगड मॅडम सहाय्यक अध्यापिका अंभोरे मॅम यांचे देखील त्यांना मोलाचे सहकार्य लाभले..
निसर्गाचं समतोल राखण्यासाठी हा अवलिया वृक्ष मित्र रात्र दिवस झटत आहे अन् हजारों वृक्ष लागवड करत आहेत आपण देखील यांची प्रेरणा घेत एक तरी झाड लाऊन त्यांच् संवर्धन करन गरजेच आहे, अश्या या ध्येयवेड्या वृक्ष मित्रास माझा साष्टांग नमस्कार..
Discussion about this post