प्रतिनिधी
कैलासराजे घरत
खारपाडा पेण
डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दयानंद चोरगे साहेब यांच्या आदेशाने आणि अध्यक्ष योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने श्री विरेनंदादा चोरगे नेतृत्वाखाली डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (NGO) आयोजित घरगुती देखावा( डेकोरेशन ) गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील दुष्मी ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील श्री.समाधान जयराम देसले ( दुष्मी )यांच्या घरच्या बाल हनुमान फळ समजून सूर्याला पकडण्यासाठी निघाला आहे घरगुती देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला.
डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (NGO) आयोजित घरगुती देखावा( डेकोरेशन गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धक भाग घेत असतात घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धामध्ये देखावा सादर करून त्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. गणेशोत्सव निमित्ताने आपण एकत्र येतो. नातेवाइकांना भेटतो. सामाजिक ऐक्यतेचा संदेश मिळतो.
असाच एक देखावा दुष्मी गावातील श्री समाधान देसले यांच्या घरी पाहायला मिळाला. गेल्या 10 वर्षापासून ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या चलचित्रात बाल हनुमान सूर्याला लाल फळ समजून पकडण्यासाठी निघाला आहे तर दुसऱ्या चित्रात श्री गणेशाची मूर्ती धनुष्यधारी प्रभू श्रीरामाच्या स्वरूपात असून दुसरे
चलचित्रात हनुमान आपली छाती फाडून आपल्या हृदयात श्रीराम आणि सीता मातेचे चित्र आहे. याबाबत जेव्हा माता सीतेची हनुमान सुटका करून घेवून आयोध्यत माघारी परततात तेव्हा सीता माता आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार हनुमानाला देतात तेव्हा हनुमान एक एक मणी फोडून पाहतात त्यात श्रीराम दिसत नाही ते फेकून देतात तेव्हा सीता माता म्हणते तुझ्या हृदयात तरी श्रीराम आहेत का तेव्हा हनुमान आपली छाती फाडून प्रभू राम आणि सीता मातेचे दर्शन होते. असे होते दास रामांचे हनुमानजी. अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला..बोला जय जय हनुमान….
साधारणपणे हा देखावा निर्माण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. समाधान देसले हे स्वतः इलेक्ट्रीसियन असल्यामुळे तांत्रिक बाबीत अडचण निर्माण होत नाही. या देखाव्याचे जे थीम साँग आहे त्याची ऑपरेटिंग 10 वर्षाची अन्वी(छोटू )देसले करते. या देखाव्याचे चलचित्र आणि हनुमान मूर्ती निर्माण करण्यासाठी तेजल देसले, सिद्धी देसले, साक्षी देसले, साची देसले, सुहाना देसले तसेच गणपती मखर सजावट रुपेश देसले, दिया देसले, रूही देसले ,भूमी देसले, विकी देसले यांचे सहकार्य लाभले. साधारणपणे 25 ते 30 जणांचे एकत्र देसले कुटुंबीय अतिशय गुण्यागोविंदाने मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करतात.
डी वाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा सरचिटणीस सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी स्वतः श्री. समाधान देसले यांच्या घरी जाऊन त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी देसले कुटुंबियांकडून संतोष देसले यांनी कैलासराजे घरत यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. पुढच्या वर्षी देखील अशाच प्रकारचे सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.





Discussion about this post