महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्या साठीचा एक छोटासा प्रयत्न म्हणून प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य खुल्या ढोल ताशा वाद्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या शानदार उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेत विविध ढोल ताशा पथकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
सहभागी संघातून प्रथम क्रमांक तरुण गणेश मंडळ कुत्तर विहीर ढोल ताशा पथकास 21000/- व प्रशस्तीपत्र ,द्वितीय क्रमांक अंबाजोगाईचा राजा श्री साई गणेश मंडळाच्या ढोल ताशा पथकास 15000/- त्याचबरोबर तृतीय क्रमांक बाल गणेश मंडळाच्या ढोल ताशा वाद्य पथकास 11000/- रुपये व प्रशस्तीपत्र त्याचबरोबर उत्तेजनार्थ मंगळवार पेठ येथील नवयुवक गणेश मंडळाच्या ढोल ताशा पथकास 5000/- व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्याचबरोबर उत्कृष्ट ढोल वादक तरुण गणेश मंडळाची कु ईशीता संतोष काळे तर, ताशा वादक देशपांडे गल्ली,महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळाचे यांना देण्यात आला.
या स्पर्धेत लहान मुले मुली व युवतींचा लक्षणीय सहभाग दिसुन आला. यामुळे आयोजित करण्यात आलेली स्पर्धा सफल झाल्याची भावना मनात निर्माण झाली.
प्रियदर्शनी क्रिडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ – अंबाजोगाई
Discussion about this post