हुतात्मा वाघ यांच्या स्मारकावर अनेकांची पुष्पांजली
फुलंब्री ( प्रतिनिधी ) अमोल कोलते
मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाचा कर्दनकाळ हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांना बोरगाव अर्ज येथील स्मारकावर त्यांच्या पुण्यतिथी निमित्त १४ सप्टेंबर रोजी बोरगाव अर्ज ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यासह नाभिक समाजातील विविध संघटनांच्या वतीने पुष्पांजली अर्पण करत अभिवादन करण्यात आले .
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही सरासरी एक वर्षापेक्षा जास्त काळ निजामाच्या रजाकारांनी मराठवाड्यावर आपले राज्य चालवले होते . यां निजाम रजाकारांच्या महिला – पुरुषावरील जुलमी अत्याचारला कंटाळून अनेकांनी हैदराबादच्या निजाम विरुद्ध मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढयात स्वतःला झोकून घेतले .यातील निजामाचा कर्दनकाळ बोरगाव येथील हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांनी निजामी शिक्षण पद्धतीला विरोध करून प्रथम बंड केला होता . महिलांवर डोळ्यादेखत होणारे अत्याचार सहन न झाल्याने त्यांनी आपल्या सवंन गड्यासह स्वातंत्र सैनिकांनी बंड पुकारत निजामाना पळो कि सळो करून सोडले होते .
१४ सप्टेंबर रात्री त्यांचे गणिमी काव्याने पकडून त्यांचे नांदखेडा शिवारात शिरच्छेद करण्यात आला होता . त्यानंतर त्यांचा मृतदेह रात्रीच्या अंधारात काटया – फसाट्यावर टाकून सवंगड्यानी अंत्यसंस्कार केले होते . व त्यापुर्वी निजामी सैनिकानी त्यांचे शिर बोरगाव येथील वेशीवर लटकवण्यात आले होते .यातून दहशत निर्माण होऊन सैनिक हार मानतील अशी निजामाच्या अपेक्षा होती ती फोल ठरली आणि लढा आणखी तीव्र होत गेला आणि १७ सप्टेंबरला मराठवाडा निजानाच्या जोखडातून मुक्त झाला .अशा या शूरवीराचे शिर असलेल्या ठिकाणी समाधी स्थळ असून बोरगाव येथे त्यांचे भव्य असे स्मारक आहे . या ठिकाणी बोरगाव अर्ज ग्रामपंचायत व ग्रामस्थ व नाभिक समाजाच्या विविध संघटना पदाधिकारी यांनी अभिवादन केले.
यावेळी सर्वप्रथम सरपंच शिवाजी खरात यांच्या हस्ते समाधी स्थळाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .त्यानंतर सांडू सखाराम वाघ यांच्या स्मारकावर नाभिक संघटनेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच शिवाजी खरात ‘ उपसरपंच राजेंद्र बलांडे , ज्ञानेश्वर बलांडे , अ भा जिवा सेना प्रवक्ता सुरेश बोर्डे , राष्ट्रीय नाभिक संघटना मराठवाडा संर्पक प्रमुख दादासाहेब काळे , सोनाजी साळवे , कृष्णा वाघ , दिलीप वाघ , नाभिक महामंडळाचे संतोष बोराडे , बबनराव वाघ , संजय पंडीत , शरद पंडीत , अशोक वैद्य , संतोष वाघ , शाम आदमाने , मधुकर वाघ , रत्नाकर वाघ , अतुल वाघ , संजय तुपे , बापुराव चोपडे , तालुकाध्यक्ष राजेश सुरडकर , कचरू वाघ , पंडित बोर्डे , विष्णु आदमाने ,गणेश वाघ , गणेश साठे , व्ही ए च बन्सोडे , रामेश्वर बलांडे , कैलास वाघ , शिवाजी वाघ , मधुकर वाघ , पंढरिनाथ वाघ , यांच्यासह अनेक ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती .
.
Discussion about this post