

कल्याणात रंगला मोदक महोत्सव..
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सुभेदार वाडा कट्टा व कल्याण विकास मंडळ आयोजित गणेश उत्सवानिमित्त मोदक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सव सर्व वयोगटातील 80 महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला उकडीचे मोदक व साच्या पासून तयार केलेले मोदक असे दोन गट या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले.
होते, त्यात दोन्ही गटामध्ये ५-५असे एकूण १० उत्तम नैवेद्य मोदक तयार करणाऱ्या महिला स्पर्धकांची परीक्षकांन मार्फत निवड करून दहा विजेत्यांना
स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
अशा प्रकारे सर्व माहिती देतांना सुभेदारवाडा कट्ट्याचे खजिनदार श्री ए.जी .पाटील व संस्थापक श्री दीपक जोशी , सदस्य व सर्व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post