गडचिरोली :- माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने, गडचिरोली जिल्हा शिवसेना महिला संपर्क प्रमुख मा.सौ.वर्षाताई मोरे (कुंभारे)यांनी दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोज शनिवार ला गडचिरोली विधानसभेतील काही गावांना भेटी देवून,” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट” अभियानाचा शुभारंभ केला.
गडचिरोली शहरासह काही गावातील कुटुंबांना भेटी देऊन कुटुंबातील महिलांची आस्थेने चौकशी करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षपणे होत आहे किंवा नाही आणि या योजनेचा लाभ, सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना मिळाला किंवा नाही यांची गडचिरोली विधानसभा अंतर्गत विविध गावातील आणि शहरातील तब्बल २५ कुटुंबातील महिलांना भेटी देऊन मा.सौ.वर्षाताई मोरे (कुंभारे) यांनी विचारपूस केली.
यावेळी गडचिरोली विधानसभा महिला जिल्हा प्रमुख मा.सौ.श्रीदेवीताई वरगंटीवार , उपजिल्हाप्रमुख मा. सौ संगीताताई हर्षे, मा.सौ.वैशालीताई किरमेजवार गडचिरोली शिवसेना महिला तालुका प्रमुख, धानोरा तालुका प्रमुख मा.सौ. मेघाताई कोसरे , शहर प्रमुख मा.शितलताई बनसोड यासह शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Discussion about this post