
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील शेतकऱ्यांचे जंगली हत्तींनी केले नुकसान…
गडचिरोली/आरमोरी:- ओडिसा राज्यातून आलेला जंगली हत्तींचा कळप सध्या आरमोरी तालुक्यात ठाण मांडून बसला आहे.
काही दिवसांपूर्वी देसाईगंज, कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धान पिकांची नासाडी केल्यानंतर आता आरमोरी तालुक्यातील वैरागड व परिसरातील शेतकऱ्यांचे धानपीक पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले
असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यामध्ये वैरागड येथील रवींद्र दुमाने, यादव मेश्राम, पांडुरंग सरदारे, दिलीप कांबळे, खुशाल नेवारे, रघुनाथ शिरसागर, उमाजी क्षीरसागर, रोहिदास बोदेले, मनोहर बनकर, नितीन धकाते, किशोर कोंडेकर व परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
ऐन धानपीक निसावण्याच्या काळात जंगली हत्तींनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
शेतकऱ्यांचे जंगली हत्तींनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असल्याची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी क्षणाचाही विलंब न लावता; लगेच आज, १५ सप्टेंबरला वैरागड व
परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांची पाहणी करून वनविभागाचे वनाधिकारी, कर्मचारी यांना संपर्क साधून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे फर्मान सोडले आहे.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, वैरागड ग्रामपंचायतीचे उपसरपंच भास्कर बोडणे, बालाजी बोबडी, महादेव दुमाने, नेताजी बोडणे व इतर परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
Discussion about this post