
प्रतिनिधी: भरत पुंजारा
दि.16 सप्टेंबर रोजी पालघर(डहाणू, तवा) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही नवतरुण मित्र मंडळ यांच्यातर्फे गणेश उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकारांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक तवा,ब-हाणपुर, कोल्हाण, धामटणे, पेठ, वांगर्जे, मुरबाड ह्या गावातून आले होते.त्यांनी प्रत्येक कलाकारांना उत्तम प्रतिसाद दिला.ह्या कार्यक्रमामध्ये तवा गावचे समाजसेवक योगेश नम, महादु नम, प्रदिप नम, संतोष वझे , चिंतामण नम, सुनिल वनगा हेही उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष कुणाल पासारे, उपाध्यक्ष प्रतिक धांगडा , समाजसेवक मुकुंद नम, जितेश तुंबडा, प्रल्हाद नम, तसेच मंडळाचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वी केला.

शेवटी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या कलाकारांना मंडळाकडून बक्षिसे दिल्यानंतर डी.जे. च्या तालावर सर्व रसिक प्रेक्षकांनी ठेका धरून आनंद घेतला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष केदार यांनी केले.
Discussion about this post