आजरा – प्रतिनिधी,
आजरा आणि गडहिंग्लज सीमा भागातील वाटंगी आणि अर्जनवाडी, कानडेवाडी या गावातील शेतकर्यांचे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले असून भागात सद्या सुगीचे दिवस जवळ आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजरा भागात बांबूचे कोंब खाण्यासाठी टस्कर हा सिरसंगी, येमेकोंड भागात मुक्काम असून वाटंगी येथील शामराव बाबू नांदवडेकर यांच्या भात पिकाचे नुकसान केले तसेच अर्जुनवाडी येथील गताराम वाईंगडे तसेच कानडेवाडी येथील विठठल सासुलकर यांच्या शेतातील पाण्याच्या टाक्याच सोंडेने फुबॉल सारख्या उडवून फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
ऊस नाचना इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले आहे. याकडे त्या शिमा भागातील पिडीत शेतकऱ्याना न्याय शासन आणि तालुका वनविभाग अधिकारी याच्या सहकार्याने मिळावा.
Discussion about this post