आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 या रोजी बाळ भगवान निवासी अपंग विद्यालय देवणी. तालुका देवणी, जिल्हा लातूर या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून माननीय. श्री हनमंत आप्पा माणिकराव धनुरे ,(प्रहार जनशक्ती पार्टीचे निलंगा मतदार संघातून अधिकृत उमेदवार ), यांच्या हस्ते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री बंड्याप्पा पडसळगे सर, मा.श्री अविनाश शिंदे सर, बागवान सर, तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय .श्री सतीश चव्हाण सर, शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. एल .एल .कुडके सर, यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला.
त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री हनमंत अण्णा धनुरे सर श्री बंडयाप्पा पडसळगे सर अविनाश शिंदे सर, बागवान सर, तसेच माननीय संस्थेचे कोषाध्यक्ष सतीश सर यांचा शाल व श्रीफळ देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला आणि प्रमुख पाहुणे म्हणून माननीय बंडप्पा पडसळगे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष हनमंत अण्णा धनरे सरांनी आपण विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व सर्वानुमते शाळेतील विद्यार्थ्यांकरिता लागेल त्यावेळेस किंवा अडचणीच्या वेळेस मदत करण्याचे आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिले .
त्याचबरोबर श्री हनमंत आप्पा माणिकराव धनुरे साहेब यांच्या सहकार्यातून बाळ भगवान निवासी अपंग विद्यालय देवणी .या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पॅड, पेन्सिल, वह्या, इत्यादी साहित्याचे वाटप करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दीपक पाटील सर, यांनी केली आणि कार्यक्रमाची सांगता गणेश विसर्जनाच्या पूजेने करण्यात आली यावेळेस शाळेतील कर्मचारी रामेश्वर सुरनर सर, कुलकर्णी सर, सूर्यकांत पांढरे सर, अमोल जीवने सर, उद्धव काळे, सुनील डुमणे तसेच शाळेतील इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते….. प्रतिनिधी श्री दीपक पाटील बेंम्बरेकर… (9823752367)
Discussion about this post