
प्रतिनिधी-सोमनाथ यादव खोमणे
सिद्धटेक, ता. कर्जत– प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज ये-जा करतात. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सिद्धटेक घाटाचा नवीन बांधकाम पूर्ण केले. परंतु, या घाटावर सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या मते, घाटाची स्वच्छता नियमित केली जात नाही. येथे प्लास्टिकच्या पिशव्या, अन्नपदार्थांचे अवशेष आणि घाण साचलेली दिसते. काही ठिकाणी दुर्गंधीही पसरली आहे.

भाविकांची तक्रार –
प्रशासनाचा निष्काळजीपणाभाविकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून घाटाचा सुशोभीकरण केला असला, तरी देखभाल आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. “इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे स्वच्छतेची अत्यंत गरज आहे. परंतु प्रशासन किंवा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.

स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, येथे नियमित स्वच्छता मोहीम राबवावी आणि कचरा व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. अन्यथा, हा घाट गोंधळ आणि अस्वच्छतेचे केंद्र बनेल
Discussion about this post