प्रतिनिधि- कोल्हापूर – दि. १९/०९/२०२४
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वच कृषिपंप वीज ग्राहकांची शेतीपंपाची वीज बिले अवाजवी,चुकीचे व फुगविण्यात आलेले आहेत.सदर ग्राहकांची चुकीची वीज बिले दुरुस्त होणे आवश्यक आहे.त्यासाठी जिल्ह्यातील वीज ग्राहक जोडभार व वीज बिल दुरुस्तीचे अर्ज करीत आहेत,पण आपल्या कार्यालयाकडून सदर वीज ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करणेबाबत सुचविले जात आहे. ते चुकीचे व अन्यायकारक आहे सदर ग्राहकांचे प्रत्यक्ष अर्ज स्विकारुन समक्ष जागेवर येऊन व स्थळ तपासणी करुन आज अखेरची वीज बिले व थकबाकी रक्कम दुरूस्त करुन अचूक जोडभार,अचूक बिल व अचूक थकबाकी रक्कम निश्चित करावी.
काही कृषिपंप वीज ग्राहकांची मिटर रिडींग प्रमाणे बिलींग नसून अवाजवी व सरासरी जादा आकारणी केलेली आहे.मीटर बंद आहे म्हणून सरासरी बिलींग म्हणून जादा आकारणी केलेली आहे मीटर नाही तथापि जादा जोडभार (एच.पी. ) दाखवून त्यानुसार जादा आकारणी केली जात आहे.या सर्व बाबींची वीज ग्राहकाच्या अर्जाप्रमाणे दुरुस्त करुन द्याव्यात.तसेच ज्या ग्राहकांचे मीटर असूनही एच.पी. वरती वीज बिलाची आकारणी होत आहे त्यांची मीटरवरती बिलाची आकारणी करणेत यावी. ज्यांची मीटर महापूर व अन्य कारणामुळे खराब व नादुरुस्त आहेत त्यांची मिटर महावितरण कंपनीने स्वतः स्वखर्चाने बसवून देऊन त्याप्रमाणे अचूक रिडींगचे वीज बिले द्यावीत.
अन्यथा या विरोधी तीव्र आंदोलन करु असा इशारा इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर वअधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांना देण्यात आला.
यावर महावितरण कडून लेखी अर्ज स्वीकारले जातील आणि स्थळ पाहणी करून बिल दुरुस्तीची कारवाई करू असे आश्वासन मुख्य अभियंता श्री काटकर यांनी दिले, तसेच शेतकऱ्यांनी अपघात होऊ नये याकरिता शेतात जाताना रोज सावधपणे डांबावरील वायर तुटलेली नाही याची खात्री करणे, डांबला जनावरे बंधू नये अशा प्रकारे सावधानता बाळगवी जेणेकरून अपघात टाळता येतील असे सुचविले.
यावेळी वीज तज्ञ प्रताप होगाडे, विक्रांत पाटील-किनीकर,चंद्रकांत पाटील- पाडळीकर, जावेद मोमीन,सचिव मारुती पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post