कुरुंदवाड प्रतिनिधी/ महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये या वर्षी कुमार विद्यामंदिर नंबर तीन कुरुंदवाड,या शाळेने सहभाग घेतला होता या स्पर्धे अंतर्गत या शाळेचा तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे.
व सदर शाळेसाठी दोन लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पटाची शाळा ,आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये नंबर आल्याबद्दल या शाळेचे देखील संपूर्ण शिरोळ तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय एन व्ही पाटील साहेब तसेच अनिल ओमासे साहेब, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक रवीकुमार पाटील सर उपस्थित होते.
तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय एन व्ही पाटील व अनिल ओमासे साहेब यांनी या शाळेचं तोंड भरून कौतुक केलं त्याप्रसंगी मुख्याध्यापक आदरणीय रविकुमार पाटील सर यांनी आभार मानले.
Discussion about this post