वणी : तालुका स्तरीय रनिंग रेस स्पर्धा वणी येथील शासकीय मैदान येथे दिनांक १९ सप्टेंबर रोजी पार पडली. या स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी कु. तन्वी ईश्वर जेंगठे ही अंडर 17 रनिंग रेस मुली या प्रकारात प्रथम आली तसेच याच शाळेची विद्यार्थिनी आफरिन अब्दुल रहेमान अन्सारी हिने दुसरा क्रमांक पटकाविला. रनिंग रेस अंडर १७ मुलांमध्ये कामरान शरिख शेख तसेच अंडर १४ मध्ये शील प्रवीण खाडे या विद्यार्थ्यांनी प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थासचिव मा. श्री. ओमप्रकाश चचडा, संचालक मा. विक्रांत चचडा, सहसचिव मा. चिन्मय चचडा, प्राचार्य मा. प्राचार्य प्रफुल महातळे, क्रीडा प्रशिक्षक सौ.सरिता राऊत तसेच इतर शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करीत आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post