
युवा वर्गाला पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण देण्याच्या हेतूने महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने प्रमुख उपस्थित होते.
“कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ कोल्हापूर व सांगली परिसरातील युवक-युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये स्कील डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना केली आहे.
या अंतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर
“आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा”चे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. महाविद्यालयातील या केंद्राद्वारे मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे”, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी यावेळी दिली.
सदर उपक्रमास महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजय देशमुख व उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या समन्वयक प्रा. एस. एस. रांजणे, स्टुडंट अफेयर्स डीन डॉ. जे. एम. शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. दिग्विजय पवार, ट्रेनर प्रा. प्रथमेश पोवार व प्रा. सर्वजित भोसले,
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रतिनिधी रामचंद्र पांढरे यांच्यासह इतर डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post