
आरमोरी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या वतीने विवीध शासकीय योजनांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आरमोरी शहरातील ताडूलवार नगर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शासनाच्या विवीध योजना जसे कि, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा विविध योजनांची माहिती व शासकिय योजना ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात,
सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे अडलेले प्रश्न, समस्या मार्गी लागाव्यात, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व्हावी, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गावातील व शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णाजी गजबे यांनी केले.
या शिबिरा प्रसंगी उपस्थित मुकुंलजी खेवले सर, बुथ प्रमुख राजूजी जराते, योजनादुत तालुका संयोजक सचिन कुथे व त्यांची टीम संदीप इन्कने ,सिद्धार्थ रामटेके, पिंटूराज खोब्रागडे ,अनंत नखाते ,नितेश नारदेलवार, चेतन पासेवार इतर मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post