मुकुंद गायकवाड (पाथर्डी तालुका प्रतिनिधी)
पाथर्डी. दि.23.मोहरी.कै.आसाराम गायकवाड यांच्या चौदाव्या स्मृति दिनानिमित्त मातोश्री लॅब चे संचालक डॉक्टर विठ्ठल गायकवाड व आदिनाथ नागरी पतसंस्थेचे मॅनेजर मुकुंद गायकवाड यांनी पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील मतिमंद मुलांचे बालगृह व निवासी मतिमंद विद्यालयाच्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना मिस्ट अन्न भोजनाची आयोजन केले होते कैलासवासी आसाराम गायकवाड यांचा वैचारिक वारसा जपत या दोन्ही भावांनी गेली 14 वर्षे वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या वडिलांच्या आठवणी जागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला कोरोनाच्या काळात निराधार महिला व विधवा महिलांना किराणा किटचे वाटप केले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान टाकळी या शाळेला कॉम्प्युटर भेट दिला होता तसेच गेल्या वर्षी पाथर्डी तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सतरा प्रतिभा संपन्न गुणवान न कार्यकर्त्यांना पुरस्कार वितरण करून सन्मानित केले होते.
तसेच मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना एक वर्षी असेच गोड जीवन दिले होते मातोश्री लॅबच्या माध्यमातून सेवा करत असताना दिव्यांगासाठी मोफत रक्त लघवी तपासणी केली जाते असा हा सामाजिक कार्याचा वसा या गायकवाड कुटुंबाला असून त्यांची चुलते सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात समाजातील अनिष्ट रूढी परंपरा भोंदूगिरी यावर ते शाळा महाविद्यालय मधून प्रात्यक्षिकासह प्रबोधन करण्याचे काम करतात व वास्तवतेचे झणझणीत अंजन डोळ्यांमध्ये घालून भरकट चाललेल्या समाजाला मार्गस्थ करण्याचे काम ते करतात असा हा सर्व गायकवाड परिवार सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करत आहे त्यांनी आज मतिमंद मुलांकरता हा भोजनाचा कौतुकास्पद कार्यक्रम घेऊन समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम केले आहे या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक आदिनाथ शिरसाट डॉक्टर रामदास बर्डे प्रसाद निराळी सर विष्णू गायकवाड डॉक्टर विठ्ठल गायकवाड मुकुंद गायकवाड ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य संपर्कप्रमुख कविवर्य बाळासाहेब कोठुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक आदिनाथ शिरसाठ यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले की मतिमंद मुलांची सेवा करून आपण मोठे पुण्याचे काम केले आहे वास्तविक पाहता अशी पंगत आपण एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी पण देऊ शकत होता .
परंतु आपण निराधार मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला याच हाताला परमेश्वर ताकद देऊ अशी सद्भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली व मराठा महासंघ पाथर्डी तालुका अध्यक्ष डॉक्टर रामदास बर्डे यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही शाळेला कायमस्वरूपी मदत करीत असल्याचे सांगितले. तसेच सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांनी सामाजिक भावनेतून आम्ही काम करत असल्याचे आपल्या मनोगत म्हटले आहे यावेळी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे डॉक्टर विठ्ठल गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिनाथ शिरसाट सर यांनी केली तर संभाजी झावरे यांनी सर्वांचे आभार मानले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश मेघनहर सर यांनी केले या कार्यक्रमासाठी नवनाथ गायकवाड गिरीश गायकवाड योगेश गायकवाड तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
Discussion about this post