नांदेड : सामाजिक राजकारणाचा वसा घेऊन गेल्या अनेक वर्षापासून नांदेडच्या राजकारणात सक्रिय असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि महानगरपालिकेच्या माजी सभापती सौ संगीताताई पाटील डक यांच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यास आज पाणी फिल्टर भेट देण्यात आले.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या विठ्ठल पाटील डक मित्र मंडळाच्या वतीने यावेळी ही नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवला आहे . यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यास पाणी फिल्टर भेट देण्यात आले .
यावेळी माजी सभापती सौ संगीता पाटील डक यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे, विठ्ठल पाटील डक मित्र मंडळाचे सेजल विठ्ठल पाटील , म्हस्के, पावडे, गोविंद सूर्यवंशी तळणीकर, अनिल पूयड, शहाजी भोसले , शुभम सावंत यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post