#राज्यातील #साखर #कारखान्यांचा #ऊस #गळीत #हंगाम #येत्या #१५ (#पंधरा)#नोव्हेंबरपासून #सुरू #करण्याचा #निर्णय #घेण्यात #आला असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयानं कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. या बैठकीत साखर उद्योगाशी संबंधित विविध विषयांबाबत चर्चा झाली.
केंद्र शासनानं इथेनॉल वर्ष २०२४-२५ मध्ये उसाचा रस, साखर सिरप, बी-हेवी, सी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. तसंच उसाचा रस बी-हेवी मोलॅसेसपासून रेक्टिफाइट स्पिरिट व एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (Rectified Spirit/Extra Neutral Alcohol) निर्मितीसाठी परवानगी दिली आहे, यानुसार राज्यात कार्यवाही करण्यात येईल. साखर उद्योगाशी संबंधित असलेल्या डिस्टिलरी प्रकल्पांमधील रेक्टिफाइड स्पिरिट व ईएनए अल्कोहोलवरील शुल्काबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
शासन व साखर उद्योगाशी निगडित महत्त्वाच्या उपक्रमांसाठी साखर कारखान्यांकडून करण्यात येणाऱ्या कपातीबाबत चर्चा झाली. साखर संकुल देखभाल निधीसाठी प्रति टन ५० पैसे कपात करण्यात येत होती, ती रद्द करण्यास मान्यता दिली.
उसाच्य प्रतिनिधी.सिताराम दुधाने. 9960559965.वसमत
Discussion about this post