दिनांक २१/०९/२०२४ वार शनिवार रोजी सेवाभावे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री.विजयराव खुशालसा सोनवणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवाभावे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर तळोदा तालुक्यातील राणीपूर येथे घेण्यात आले.
यावेळी प्रथम आई देवमोगरा माता, परमपवित्र भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली.
या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य सौ संगीताताई प्रकाशदादा वळवी, राणीपूर गावाची सरपंच सौ. सुशीलाताई सांगदेव वळवी, पंचायत समिती माजी सदस्य श्री.सांगदेव दादा वळवी, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत विशेष संपर्क सहप्रमुख श्री.विजयराव खुशालसा सोनवणे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवाप्रमुख डॉ. शांतीलाल पिंपरे, निम्स हॉस्पिटल कॅम्पप्रमुख रवींद्र तमाईचे सर, सर्जन डॉ.निलेश शिंदे, नेत्र तपासणी डॉ.अश्विनी मुकरंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र कलाल- कलार समाज संघटना चे सचिव श्री. धनंजय सूर्यवंशी सर यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केले.
यावेळी एकूण १८५ रुग्णांनी तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे संचालक श्री.अतुल भिमसिंग पाटील, श्री.नकुल दिल्या ठाकरे, श्री.सुनील मदन मोरे,श्री. शंकर जुगलसिंग मोरे,श्री संतोष चौधरी, श्रीमती.कविता कलाल, सौ.गीताताई ठाकरे यांनी केले.
Discussion about this post