पाळधी तालुका धरणगाव
जीपीएस मित्रपरिवार व पारधी पोलीस स्टेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिर
सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे रक्तदान शिबिर होत नाही जळगाव जिल्ह्यातील रक्तपेढी मध्ये रक्ताचा पुरवठा कमी असल्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे ही अडचण लक्षात घेता जीपीएस मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी पाळधी पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक प्रशांत कंडोरी साहेब यांच्याशी चर्चा करून आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराच्या आयोजन केले शिबिरासाठी माधवराव गोडवल कर रक्तपेढी जळगाव डॉक्टर राहुल चौधरी व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून त्वरित शिबिराच्या आयोजन केले व शिबिर शासकीय विश्रामगृह पाळधी येथे घेण्यात आले शिबिरामध्ये पोलीस स्टेशनचे कर्मचारी व जीपीएस ग्रुपचे सर्व सभासदांनी रक्तदान केले शिबिर यशस्वीतेसाठी माधवराव गोडवालकर रक्तपेढीचे व्यवस्थापक डॉ. राहुल चौधरी डॉ.जयंत पाटील डॉ.मकरंद वैद्य डॉ.दिपाली पाटील डॉ.राजेश पाटील व जीपीएस ग्रुपचे अध्यक्ष प्रतापराव पाटील सचिव अनिल माळी सदस्य अरुण पाटील गोकुळ ननवरे दिनेश कडोसे अनिल माळी गजानन ठाकूर व इतर सभासद यांनी परिश्रम घेतले
Discussion about this post