• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रामाणिक प्रयत्न हीच खरी कमाई -राजाराम पवार

by
February 15, 2026
in Blog
0
प्रामाणिक प्रयत्न हीच खरी कमाई -राजाराम पवार
0
SHARES
116
VIEWS
Ad 1

दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे दहावी सदिच्छा समारंभ उत्साहात
चंदगड : प्रतिनिधी
“दहावीची परीक्षा केवळ गुणांची नाही, तर तुमच्या जिद्दीची आणि आत्मविश्वासाची आहे. यश हे अंतिम ध्येय नसते; प्रामाणिक प्रयत्न हीच खरी कमाई असते,” असे प्रेरणादायी प्रतिपादन केंद्रप्रमुख राजाराम पवार यांनी केले. ते दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे आयोजित इयत्ता दहावीच्या सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर पी पाटील होते. समारंभाची सुरुवात कु. फाल्गुनी दुगाणी हिच्या प्रभावी प्रास्ताविकाने झाली, तर पाहुण्यांचा परिचय कु. मनाली कांबळे हिने ओघवत्या शब्दांत करून दिला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पवार यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सातत्य आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिले. “शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे आशीर्वाद आणि तुमचा सातत्यपूर्ण अभ्यास हेच तुमचे खरे भांडवल आहे. आयुष्याच्या वाटचालीत कष्ट आणि प्रामाणिकता कधीही सोडू नका,” असा संदेश त्यांनी दिला.
प्रमुख वक्ते विनायक पिळणकर यांनी काव्यात्मक शैलीत विद्यार्थ्यांना प्रेरित करताना म्हटले,
“उंच भरारी घ्या, आकाशाला भिडा;
स्वप्नांच्या वाटेवर धैर्याने चला.
कष्टांच्या शिदोरीने पुढे सरका,
यश तुमच्या पावलांशी नतमस्तक होईल.”
“परीक्षा हा केवळ एक टप्पा आहे; आयुष्याची शर्यत अजून मोठी आहे. या शर्यतीत स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, व्ही. के. गावडे व संजय साबळे यांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कु. आर्या निळकंठ, संगिता यमकर, हर्षद बामणे, वेदांत उंबरे, रसिका हदगल व रूपाली यमकर या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य आर. पी. पाटील म्हणाले, “जीवनाच्या प्रवासात संयम, शिस्त आणि सकारात्मकता कायम ठेवा. यश मिळाले तर नम्र राहा; अपयश आले तर धैर्याने उभे राहा. परिस्थितीवर मात करणारेच खरे विजेते ठरतात.”
समारंभाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला साऊंड सिस्टीम भेट देऊन कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. सूत्रसंचालन कु. निधी पाटील हिने केले, तर आभार प्रदर्शन कु. नेहा कांबळे हिने मानले.
उत्साह, प्रेरणा आणि भावनांनी ओथंबलेला हा सदिच्छा समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात ठरला

🎯 वाटंगी–किणे ₹३० लाखांच्या रस्त्याचे जल्लोषात उद्घाटन.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

आजरा तालुका,वाटंगी ते किणे या महत्त्वाच्या मार्गावरील ₹३० लाख खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आज (दि. १५ फेब्रुवारी २०२६) उत्साहात संपन्न झाले. तालुक्याचे युवा नेते जयवंतराव सुतार यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या रस्त्याचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अनिकेत चराठी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव सुतार होते.
या विकासकामासाठी आमदार शिवाजीराव पाटील तसेच तालुक्याचे नेते अशोकअण्णा चराटी यांचे सहकार्य लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या रस्त्यामुळे वाटंगी व किणे परिसरातील नागरिकांची वाहतूक सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यासाठी अशा विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.
याप्रसंगी संभाजीराव सरदेसाई, आनंदराव कातकर, विजय देसाई, शिवाजी गिलबिले, शिवप्रसाद देसाई, संदीप देसाई, संतोष चौगले, नारायण साटपे, अमोल सुतार, भिमराव सुतार, शशिकांत थोरवत, अशोक जाधव, गणपती कानडे, मधुकर जाधव, बाळू चौगले, उमेश घोरपडे, रवी देसाई, पुंडलिक नाईक, आनंदा मलगोंडे, एकनाथ नांदवडेकर, मोहन घेवडे, शिवाजी सावंत, काशिनाथ चौगले, दिलीप पाटील, राजू बुडके, सुजय पाटील, गणपती पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गोंडेगाव येथे ‘भगवान वीर एकलव्य जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

उरण तालुक्यातील सावरखार गावात महाशिवरात्री उत्सव संपन्न

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
10
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
19
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
26
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
9
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
उरण तालुक्यातील सावरखार गावात महाशिवरात्री उत्सव संपन्न

उरण तालुक्यातील सावरखार गावात महाशिवरात्री उत्सव संपन्न

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In