• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

लवकरच ८० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण होण्याची शक्यता

प्रतिनिधी :

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आला असून जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा जोमाने शेतीकामात गुंतले आहेत.

कृषी विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण ९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत सुमारे ६ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच जवळपास ७० टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास हे प्रमाण लवकरच ८० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

यंदा जिल्ह्यात ९ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापूस हे प्रमुख पीक असून सुमारे ४ लाख हेक्टरवर कापूस लागवडीचे नियोजन आहे. आतापर्यंत दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली असून यंदा हे क्षेत्र ५ लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुढील दहा दिवसांत कापूस लागवड आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कापसापाठोपाठ सोयाबीन लागवडीला देखील मोठे महत्त्व असून आतापर्यंत दीड लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच सुमारे ७० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मूग आणि उडीद पिकांच्या क्षेत्रात यंदा घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात प्रत्येकी ५ हजार हेक्टरवर मूग व उडीद लागवडीचे नियोजन होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ २३५ हेक्टरवर मूग आणि २१४ हेक्टरवर उडीद लागवड झाली आहे. पेरणीचा कालावधी संपत आल्यामुळे या पिकांचे क्षेत्र मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.

ज्वारी पिकासाठी १० हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत फक्त १४१ हेक्टरवरच ज्वारीची पेरणी झाली आहे.

जूनने दिला दगा, जुलै ठरला दिलासा

संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. अनेक भागांत पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. वणी आणि मारेगाव तालुक्यात तर पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या पावसाची परिस्थिती शेतीसाठी अनुकूल आहे. आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास १५ ऑगस्टपर्यंत ८० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण होऊन यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?

Next Post

अकलूजच्या पाणीटंचाई प्रश्नासाठी किरण साठे यांची पुढाकाराने धाव; नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
13
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
26
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
13
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
33
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post

अकलूजच्या पाणीटंचाई प्रश्नासाठी किरण साठे यांची पुढाकाराने धाव; नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In