• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंद्याच्या राजकारणात ऐतिहासिक वळण; ४८ वर्षांत पहिल्यांदाच पाचपुते घराण्यातील सदस्याचा जिल्हा बँकेत प्रवेशाचा प्रयत्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात मोठी आणि राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक मानली जाणारी घडामोड समोर येत आहे. तालुक्याच्या राजकारणावर गेली अनेक दशके प्रभाव असलेल्या पाचपुते घराण्यातील सदस्य पहिल्यांदाच जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

RelatedPosts

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचे कनिष्ठ चिरंजीव ॲड. प्रतापभैय्या पाचपुते यांचे नाव या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जोरदार चर्चेत असून, त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

४८ वर्षांची परंपरा मोडणार?

सन १९७८ मध्ये बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा पंचायत समितीची निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास ४८ वर्षे श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणावर पाचपुते घराण्याची मजबूत पकड कायम राहिली आहे.

या प्रदीर्घ राजकीय प्रवासात पाचपुते घराण्याने अनेक निवडणुका जिंकल्या, विविध सत्तास्थाने भूषवली; मात्र आजवर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थेट सहभाग घेतलेला नव्हता. त्यामुळे प्रतापभैय्या पाचपुते यांच्या संभाव्य उमेदवारीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तगड्या विरोधकांमुळे लढत चुरशीची होणार

जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून विविध संस्थांचे ठराव आपल्या गटाच्या उमेदवारांच्या बाजूने वळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील या जागेसाठी केवळ पाचपुते गटच नव्हे, तर इतर दिग्गज नेतेही सक्रिय झाले आहेत.

राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप आणि दत्तात्रय पानसरे यांसारख्या मातब्बर नेत्यांनीही निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कोणाचे पारडे जड ठरणार, कोणाला संस्थांचा पाठिंबा मिळणार आणि सहकाराच्या राजकारणात कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

महावितरणचा निष्काळजीपणा; पोल कोसळल्याने चार गावांचा पाणीपुरवठा सहा दिवसांपासून ठप्प

Next Post

Rayat Shikshan Sansthaच्या श्रीगोंदा कन्या विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Related Posts

Blog

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

July 5, 2026
5
Blog

भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?

July 5, 2026
3
Blog

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 5, 2026
7
Blog

ग्रामपंचायत पुरजळ वार्ड क्रमांक ३ मधील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

July 5, 2026
28
Blog

Rayat Shikshan Sansthaच्या श्रीगोंदा कन्या विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

July 5, 2026
9
Blog

सगळ्यांनीच पुण्यासारख्या शहरांची वाट धरली तर आपल्या गावाचा विकास कधी होणार?— निखिल नाळे

July 5, 2026
13
Next Post

Rayat Shikshan Sansthaच्या श्रीगोंदा कन्या विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

ताज्या बातम्या

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

July 5, 2026

भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?

July 5, 2026

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In