प्रतिनिधी: सुधीर घाटाळ

आज रोजी २६ नोव्हे.रोजी रायतळी नाईकपाडा येथे काल दि.२५सप्टे.मध्य रात्री १२.००ते २.०० वाजताच्या वाजता सुमारास पवार कुटुंबाचे घर कोसळले. अशी बातमी माहिती पडल्या असताना.बविआ पालघर विधानसभा प्रमुख अध्यक्ष तथा आदिवासी एकता सेवा संस्था चे अध्यक्ष मा. श्री. सुरेश पाडवी साहेब यांनी योगेश रमेश पवार यांच्या नुकसान झालेल्या घटनास्थळी भेट देण्यात आली.

त्या कुटुंबाला छोटीशी आर्थिक मदत करण्यात आली. आणि तलाठी नरेश नार्वेकर यांनी कॉल करून पंचनामा बद्दल चर्चा करण्यात आली. तसेच पंचनामा केले असल्याचे सांगितले. या कुटुंबाला भेट देण्यासाठी गंजाड उपसरपंच कौशल कामडी, निकणे उपसरपंच सुदाम मेरे , शूर झलकारी कातकरी एकता महासंघ डहाणू तालुका गणेश गावित, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाडवी यांनी भेट देऊन आधार दिली.

Discussion about this post