• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

१० हजार रुपये ऐवजी संगणक परिचालकांना १७ हजार रुपये मासिक मानधन द्या – आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागणी*१० हजार रुपये ऐवजी संगणक परिचालकांना १७ हजार रुपये मासिक मानधन द्या – आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागणी*

by
February 26, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

वेळेवर व वाढीव मानधन, कर्मचारी दर्जा, प्रसूती रजा, नवीन संगणक व प्रिंटर यासह ५० लाख रुपयांचा अपघात विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार बबनराव लोणीकर यांची संगणक परिचालकांना ग्वाही

मागील १४ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांच्या मागण्या आझाद मैदानावरील आंदोलनाला आमदार बबनराव लोणीकर यांची भेट

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

प्रतिनिधी –
राज्यातील सुमारे २८५०० ग्रामपंचायतीमध्ये २० हजार संगणक परिचालक मागील १४ वर्षापासून प्रामाणिकपणे काम करून राज्याध्या ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देणाऱ्या संगणक परिचालकांना महागाईच्या काळात अतिशय तुटपुंजे मानधन असून तेही ६-६ महिने मिळत नाही, ही परिस्थिती लक्षात घेता आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी प्रत्यक्ष भेटून संगणक परिचालकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले.

यावलकर समितीने ग्रामविकास विभागास दिनांक ३० मे २०१८ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार व ग्रामविकास विभागाचे तत्कालीन ग्रामविकासमंत्री मा. गिरीशजी महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी २०२३ रोजी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार व राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या कामाची गरज लक्षात घेता संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे अत्यंत गरजेचे आहे. अशी मागणी संगणक परिचालक संघटनेने केली असता आमदार बबनराव लोणीकर यांनी तुमचा आवाज निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचवतो असा शब्द उपस्थित त्यांना दिला.

महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने ग्रामविकास विभागाकडे अनेक वेळा मागणी करून सुद्धा ग्रामविकास विभागाने अद्याप पर्यंत यावलकर समितीच्या शिफारशीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्या संदर्भात कार्यवाही केलेली नाही, त्याच बरोबर ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून निधी मिळत नसल्याने संगणक परिचालकांना ६-६ महीने मानधन मिळत नसल्याने २०२४ व्या विधानसभा निवडणूकी अगोदर आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पासाठी राज्याच्या निधीतून ३३६ कोटी रुपये वार्षिक निधीची तरतूद केली असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब, तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह अर्थमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांनी केली होती व १० ऑक्टोबर २०२४ च्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे सोशल मिडीयात प्रसारित केले होते या बाबीची आठवण देखील आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना करून देऊ असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

ग्रामविकास विभागाने दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे किंवा आपले सरकार सेवा केंद्रासाठी राज्याच्या निधीतून वार्षिक ३३६ कोटी रुपयेची तरतुद केल्याचा कोणताही उल्लेख केला नाही, त्याचवेळी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य संघटनेच्या वतीने निवेदन देऊन शुद्धीपत्रक निर्गमित करण्याची विनंती केली होती, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही ग्रामविकास विभागाने केली नाही उलट ११ ऑक्टोबर २०२४ चा शासन निर्णय कुणालाही विचारात न घेता ०५ ऑगस्ट २०२५ रोजी रड करून राज्यातील ग्रामपंचायत संगणकपरिचालकांवर अन्याय केला आहे. तसेच सध्या मागील १.५ वर्षापासून संगणकपरिचालकाची नियुक्ती कोणत्याही कंपनीकडून नाही, त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देणे आवश्यक आहे अशी मागणी देखील संगणक परिचालक आंदोलन आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे केली.

संगणकपरिचालक हे ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करत असताना आजच्या महागाईच्या काळात तुटपुंजे असलेले १०,००० रुपये मानधन तरी प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला संगणक परिचालकांना मिळाले पाहिजे यासाठी ग्रामविकास विभागाने नियोजन करणे आवश्यक असताना संगणक परिचालकांना केलेल्या कामाचा मोबदला ६-६ महिने मिळत नाही. प्रत्येक वेळी मानधनासाठी शासन स्तरावर निवेदन द्यावे लागते, आंदोलन करावे लागते हि बाब दुर्दैवी असून संगणक परिचालकांची ही मागणी रास्त आहे यासाठी आपण निश्चितपणे ग्रामविकास मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू असे हे आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

शासना समोर संगणक परिचालकांचा मुद्दा मांडला असता दिनांक १६ मार्च २०२४ रोजी च्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीनी पैसे नाही दिले तर सदरील मानधनाची रक्कम शासनाकडून देण्यात येईल अशी हमीच शासनाने घेतलेली आहे. तसे ग्रामविकास विभागाच्या दिनांक १९ जुन २०२४ च्या शासन निर्णयात नमूद केलेले आहे. त्यामुळे महिन्याच्या एका निश्चित तारखेला संगणक परिचालकाचे मानधन करण्यची जबाबदारी शासनाची आहे, तरीही या महत्वाच्या मुद्द्याकडे ग्रामविकास विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संगणक परिचालकांना वेळेवर मानधन देत नाही, हा संगणक परिचालकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः पुढाकार घेईल असे हे आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

१० हजार रुपये ऐवजी संगणक परिचालकांना १७ हजार रुपये मासिक मानधन द्या – आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागणी*

*वेळेवर व वाढीव मानधन, कर्मचारी दर्जा, प्रसूती रजा, नवीन संगणक व प्रिंटर यासह ५० लाख रुपयांचा अपघात विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार बबनराव लोणीकर यांची संगणक परिचालकांना ग्वाही*

*मागील १४ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांच्या मागण्या आझाद मैदानावरील आंदोलनाला आमदार बबनराव लोणीकर यांची भेट*

प्रतिनिधी –
राज्यातील सुमारे २८५०० ग्रामपंचायतीमध्ये २० हजार संगणक परिचालक मागील १४ वर्षापासून प्रामाणिकपणे काम करून राज्याध्या ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देणाऱ्या संगणक परिचालकांना महागाईच्या काळात अतिशय तुटपुंजे मानधन असून तेही ६-६ महिने मिळत नाही, ही परिस्थिती लक्षात घेता आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी प्रत्यक्ष भेटून संगणक परिचालकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले.

यावलकर समितीने ग्रामविकास विभागास दिनांक ३० मे २०१८ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार व ग्रामविकास विभागाचे तत्कालीन ग्रामविकासमंत्री मा. गिरीशजी महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी २०२३ रोजी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार व राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या कामाची गरज लक्षात घेता संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे अत्यंत गरजेचे आहे. अशी मागणी संगणक परिचालक संघटनेने केली असता आमदार बबनराव लोणीकर यांनी तुमचा आवाज निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचवतो असा शब्द उपस्थित त्यांना दिला.

महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने ग्रामविकास विभागाकडे अनेक वेळा मागणी करून सुद्धा ग्रामविकास विभागाने अद्याप पर्यंत यावलकर समितीच्या शिफारशीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्या संदर्भात कार्यवाही केलेली नाही, त्याच बरोबर ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून निधी मिळत नसल्याने संगणक परिचालकांना ६-६ महीने मानधन मिळत नसल्याने २०२४ व्या विधानसभा निवडणूकी अगोदर आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पासाठी राज्याच्या निधीतून ३३६ कोटी रुपये वार्षिक निधीची तरतूद केली असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब, तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह अर्थमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांनी केली होती व १० ऑक्टोबर २०२४ च्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे सोशल मिडीयात प्रसारित केले होते या बाबीची आठवण देखील आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना करून देऊ असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

ग्रामविकास विभागाने दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे किंवा आपले सरकार सेवा केंद्रासाठी राज्याच्या निधीतून वार्षिक ३३६ कोटी रुपयेची तरतुद केल्याचा कोणताही उल्लेख केला नाही, त्याचवेळी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य संघटनेच्या वतीने निवेदन देऊन शुद्धीपत्रक निर्गमित करण्याची विनंती केली होती, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही ग्रामविकास विभागाने केली नाही उलट ११ ऑक्टोबर २०२४ चा शासन निर्णय कुणालाही विचारात न घेता ०५ ऑगस्ट २०२५ रोजी रड करून राज्यातील ग्रामपंचायत संगणकपरिचालकांवर अन्याय केला आहे. तसेच सध्या मागील १.५ वर्षापासून संगणकपरिचालकाची नियुक्ती कोणत्याही कंपनीकडून नाही, त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देणे आवश्यक आहे अशी मागणी देखील संगणक परिचालक आंदोलन आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे केली.

संगणकपरिचालक हे ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करत असताना आजच्या महागाईच्या काळात तुटपुंजे असलेले १०,००० रुपये मानधन तरी प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला संगणक परिचालकांना मिळाले पाहिजे यासाठी ग्रामविकास विभागाने नियोजन करणे आवश्यक असताना संगणक परिचालकांना केलेल्या कामाचा मोबदला ६-६ महिने मिळत नाही. प्रत्येक वेळी मानधनासाठी शासन स्तरावर निवेदन द्यावे लागते, आंदोलन करावे लागते हि बाब दुर्दैवी असून संगणक परिचालकांची ही मागणी रास्त आहे यासाठी आपण निश्चितपणे ग्रामविकास मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू असे हे आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

शासना समोर संगणक परिचालकांचा मुद्दा मांडला असता दिनांक १६ मार्च २०२४ रोजी च्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीनी पैसे नाही दिले तर सदरील मानधनाची रक्कम शासनाकडून देण्यात येईल अशी हमीच शासनाने घेतलेली आहे. तसे ग्रामविकास विभागाच्या दिनांक १९ जुन २०२४ च्या शासन निर्णयात नमूद केलेले आहे. त्यामुळे महिन्याच्या एका निश्चित तारखेला संगणक परिचालकाचे मानधन करण्यची जबाबदारी शासनाची आहे, तरीही या महत्वाच्या मुद्द्याकडे ग्रामविकास विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संगणक परिचालकांना वेळेवर मानधन देत नाही, हा संगणक परिचालकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः पुढाकार घेईल असे हे आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे, कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळण्यास वेळ लागत असेल तर सध्या असलेल्या १०००० रूपये मानधनात शासनाच्या निधीतून ७००० रु. वाढ करून संगणक परिचालकांचे मासिक मानधन १७००० रुपये करणे, ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना कायमस्वरूपी जॉब सेक्युरिटी, कंत्राटी कामगारा प्रमाणे सर्व लाभ व सुविधा देणे, मागील १४ वर्षापूर्वी दिलेले संगणक व इत्तर साहित्य खराब झाल्याने संगणकपरिचालकांना ऑनलाईन कामकाज करण्यास अडथळा होत असल्याने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने नवीन संगणक, प्रिंटर व इत्तर आवश्यक साहित्य पुरवणे, महिलां संगणकपरिचालकांना मानधनासहित प्रसूती रजा देणे, सर्व संगणक परिचालकांना किमान ५० लक्ष रुपयांचा अपघाती व आरोग्य विषयक विमा लागू करणे अशा मागण्यांची निवेदन संगणक परिचालकांनी आमदार बबनराव लोणीकर यांना दिले. यावेळी राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे राज्यसचिव मयूर कांबळे जालना जिल्हाध्यक्ष विजयानंद येडेकर मंठा तालुका अध्यक्ष दिपक खवणे अशोक चव्हाण, विष्णू ढोबळे. नारायण सोळंके, विजय प्रधान, केशव लहाने, हनुमान वाघ, जनार्धन इंगळे, भरत कव्हले, गणपत घारे रामेश्वर मुरकुटे, राम सुपेकर. ज्ञानेश्वर सूर्यवंशी. विजय वाघ. भरत कवळे. गणेश अहिरे. संग्राम ढिकले. विवेक देवरे. सुरेश मगर. शैलेश संत. सचिन माळी. सागर पवार. सचिन गरड. स्वप्निल अंभोरे. अविनाश आढे. दिलीप गाढवे. प्रल्हाद राऊत. ओम प्रकाश प्रधान. ज्ञानेश्वर साळवे यांच्यासह हजारोच्या संख्येने संगणक परिचालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे, कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळण्यास वेळ लागत असेल तर सध्या असलेल्या १०००० रूपये मानधनात शासनाच्या निधीतून ७००० रु. वाढ करून संगणक परिचालकांचे मासिक मानधन १७००० रुपये करणे, ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना कायमस्वरूपी जॉब सेक्युरिटी, कंत्राटी कामगारा प्रमाणे सर्व लाभ व सुविधा देणे, मागील १४ वर्षापूर्वी दिलेले संगणक व इत्तर साहित्य खराब झाल्याने संगणकपरिचालकांना ऑनलाईन कामकाज करण्यास अडथळा होत असल्याने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने नवीन संगणक, प्रिंटर व इत्तर आवश्यक साहित्य पुरवणे, महिलां संगणकपरिचालकांना मानधनासहित प्रसूती रजा देणे, सर्व संगणक परिचालकांना किमान ५० लक्ष रुपयांचा अपघाती व आरोग्य विषयक विमा लागू करणे अशा मागण्यांची निवेदन संगणक परिचालकांनी आमदार बबनराव लोणीकर यांना दिले. यावेळी राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे राज्यसचिव मयूर कांबळे जालना जिल्हाध्यक्ष विजयानंद येडेकर मंठा तालुका अध्यक्ष दिपक खवणे अशोक चव्हाण, विष्णू ढोबळे. नारायण सोळंके, विजय प्रधान, केशव लहाने, हनुमान वाघ, जनार्धन इंगळे, भरत कव्हले, गणपत घारे रामेश्वर मुरकुटे, राम सुपेकर. ज्ञानेश्वर सूर्यवंशी. विजय वाघ. भरत कवळे. गणेश अहिरे. संग्राम ढिकले. विवेक देवरे. सुरेश मगर. शैलेश संत. सचिन माळी. सागर पवार. सचिन गरड. स्वप्निल अंभोरे. अविनाश आढे. दिलीप गाढवे. प्रल्हाद राऊत. ओम प्रकाश प्रधान. ज्ञानेश्वर साळवे यांच्यासह हजारोच्या संख्येने संगणक परिचालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या, या विभागाला भरीव निधी मिळण्याची शक्यता…

Next Post

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ( NMMS ) 2025 – 26* *साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाडचे घवघवीत यश*…

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
9
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

207
Next Post

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ( NMMS ) 2025 - 26* *साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाडचे घवघवीत यश*...

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In