• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

SJFOI महाराष्ट्र अध्यक्षपदी ओमप्रकाश शिंदे, सरचिटणीसपदी संजय जोशी यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

अहिल्यानगर | प्रतिनिधी

सीनियर जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया (SJFOI) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची घोषणा अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. फेडरेशनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश शिंदे (जालना), तर सरचिटणीसपदी संजय जोशी (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय सचिव डॉ. जयपाल पाटील यांनी केली.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

यावेळी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून ॲड. गोपाळ शेळके, खजिनदार म्हणून डॉ. जयपाल पाटील, तर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. ओंकार माने आणि ॲड. सुनील रावडे यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.

बैठकीत डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष संदीप दीक्षित आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र निरीक्षक सौ. सुहासिनी प्रभूगावकर यांच्या मान्यतेनंतर ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. तसेच फेडरेशनची कायदेशीर नोंदणी पुणे येथील सहकार निबंधक कार्यालयात दाखल करण्यात आली असून जुलै महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याशिवाय, फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन २५ व २६ नोव्हेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

नवनियुक्त अध्यक्ष ओमप्रकाश शिंदे यांना पत्रकारिता क्षेत्रातील सुमारे ३५ वर्षांचा, तर सरचिटणीस संजय जोशी यांना पत्रकारिता, जनसंपर्क, वृत्तपत्र व्यवस्थापन, जाहिरात आणि वितरण क्षेत्रातील ३३ वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. या अनुभवाच्या बळावर राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

यावेळी विभागनिहाय पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र विभागाध्यक्षपदी भगवानराव परळीकर, कोकण विभागाध्यक्षपदी राजा मकोटे, उत्तर महाराष्ट्र विभागाध्यक्षपदी यादवराव पावशे, मराठवाडा विभागाध्यक्षपदी मकरंद जहागीरदार, रायगड जिल्हाध्यक्षपदी प्रदीप पाटील (उरण), रायगड सरचिटणीसपदी श्रीकांत सहस्रबुद्धे (महाड) आणि उपाध्यक्षपदी सौ. भारती शहा (खोपोली) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

बैठकीदरम्यान वाहतूक सुरक्षेबाबतही जनजागृती करण्यात आली. वाहनचालकांनी परवाना नसलेल्या व्यक्तींच्या हाती दुचाकी किंवा चारचाकी वाहने देऊ नयेत, अन्यथा अपघात झाल्यास वाहनमालकावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, आयेशा शेख मुलानी, बालाजी अडियल, अभयकुमार यादव आणि सौ. भारती शहा यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

Next Post

आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिनाचे महत्त्व

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
196
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post

आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिनाचे महत्त्व

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In