• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिनाचे महत्त्व

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

“आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिन ” दरवर्षी ७ जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश जगभरात सकारात्मक ऊर्जा पसरवणे आणि मानवांमध्ये आपापसातील प्रेम आणि सलोखा वृद्धिंगत करणे हा आहे. या दिवसाची सुरुवात द बीटल्स या जगप्रसिद्ध बँडचे माजी ड्रमर रिंगो स्टार यांनी २००८ मध्ये केली होती. ७ जुलै हा रिंगो स्टार यांचा वाढदिवस त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जगाकडे एक साधी मागणी केली की, प्रत्येकाने या दिवशी शांतता आणि प्रेमाचा विचार करावा. तेव्हापासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा होऊ लागला. हा दिवस साजरा करताना ७ जुलै रोजी आपापल्या स्थानिक वेळेनुसार दुपारी ठीक १२:०० वाजता लोक एकत्र येतात किंवा जिथे असतील तिथे थांबतात.शांतता आणि प्रेमाचा संदेश देतात.दुपारी १२ वाजता सर्वजण आपल्या हाताने शांततेचे प्रतीक करून “Peace and Love” शांतता आणि प्रेम या शब्दांचा उच्चार करतात किंवा मनात आठवतात. या माध्यमातून संपूर्ण जगभरात सकारात्मकतेची एक साखळी तयार केली जाते.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात हा दिवस मानवी मनाला शांतता आणि आपुलकीची आठवण करून देतो .हा दिवस आपल्याला हे शिकवतो की प्रेम आणि शांतता हीच जगाची खरी आणि सार्वत्रिक भाषा आहे, जी कोणत्याही संस्कृतीच्या किंवा भाषेच्या पलीकडे आहे.लोकांमध्ये आपापसात आपुलकी वाढवणे, एकमेकांना मदत करणे आणि चेहऱ्यावर हसू आणणे हा यामागचा शुद्ध हेतू आहे. संयुक्त राष्ट्रांद्वारे (UN) साजरा केला जाणारा अधिकृत ‘आंतरराष्ट्रीय शांतता दिन’ हा २१ सप्टेंबर रोजी असतो तर ७ जुलैचा हा दिवस विशेषतः ‘शांतता आणि प्रेम’ या भावनेला समर्पित आहे .

शांततेची सुरुवात नेहमी एका छोट्या स्मिताने होते.मनाची शांतता हीच जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे.जेथे वाद संपतात, तेथे खऱ्या शांततेचा जन्म होतो. शांतता म्हणजे प्रेमाची उपस्थिती होय .प्रेम ही अशी भाषा आहे, जी न बोलताही मनाला समजते.जगातील सर्वात सुंदर गोष्टी फक्त प्रेमानेच जिंकता येतात.दुसऱ्यांना आनंद देणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे हाच खरा धर्म आहे.प्रेम माणसांना जोडते, तर द्वेष माणसांना तोडतो. मनुष्य पृथ्वीला शांतता आणि प्रेमाने अधिक सुंदर बनवू शकतो; जेव्हा जगात प्रेमाची ताकद वाढेल, तेव्हा शांतता आपोआप नांदेल.द्वेषाचा अंधार दूर करण्यासाठी प्रेमाचा एक छोटा दिवा पुरेसा असतो.

शांततेविषयी तथागत गौतम बुद्ध म्हणतात की, “शांतता ही आतून येते, तिच्या शोधात बाहेर भटकू नका.”
महात्मा गांधी म्हणतात की ,”शांततेचा कोणताही मार्ग नसतो, शांतता हाच एकमेव मार्ग आहे.”
मदर तेरेसा शांततेविषयी म्हणतात की ,”जर आपल्यात शांतता नसेल, तर याचे कारण आपण हे विसरलो आहोत की आपण एकमेकांचे आहोत.”
स्वामी विवेकानंद म्हणतात की, “मनाची एकाग्रता आणि शांतता हीच सर्व शक्तींची गुरुकिल्ली आहे.”
दलाई लामा म्हणतात की, “जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल, तर आधी स्वतःच्या मनात शांतता निर्माण करावी लागेल. “
मनाची शांती हेच माणसाचे सर्वात मोठे धन आणि शक्ती आहे. वादळात जसे प्रतिबिंब दिसत नाही, तसेच अशांत मनात कधीही सत्य आणि योग्य मार्ग सापडत नाही.काही वेळा शब्दांपेक्षा मौन आणि शांत राहणे समोरच्याला योग्य उत्तर ठरते.शांतता जेथे तेथे प्रेम असते आणि प्रेम जेथे तेथे शांतता असते; म्हणून सर्वांनी आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिनी स्वतःच्या मनामध्ये

शांतता आणि प्रेम निर्माण करून शांतता व प्रेमाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला पाहिजे.

महानुभाव ग्रंथोत्तेजक साहित्य अलंकार पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती.

Previous Post

SJFOI महाराष्ट्र अध्यक्षपदी ओमप्रकाश शिंदे, सरचिटणीसपदी संजय जोशी यांची नियुक्ती

Next Post

विद्युत पारेषण प्रकल्पास कोडीत खुर्द ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
6
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
9
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
4
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
184
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
42
Next Post

विद्युत पारेषण प्रकल्पास कोडीत खुर्द ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In