• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भूममध्ये एफडीएची धडक कारवाई; विनापरवाना साठवलेली १,१२५ किलो दूध पावडर जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
भूममध्ये एफडीएची धडक कारवाई; विनापरवाना साठवलेली १,१२५ किलो दूध पावडर जप्त
0
SHARES
48
VIEWS
Ad 1

भूम | प्रतिनिधी

राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भूम शहरात धडक कारवाई करत विनापरवाना साठवून ठेवलेली तब्बल १,१२५ किलो दूध पावडर जप्त केली. रविवारी (दि. ५ जुलै) झालेल्या या कारवाईत ६१ बॅगमधील सुमारे २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

मिळालेल्या माहितीनुसार, भूम शहरातील बाळासाहेब घोडके यांच्या ताब्यात ही दूध पावडर आवश्यक परवानगीशिवाय साठवून ठेवण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून संपूर्ण साठा जप्त केला. या कारवाईनंतर भूम शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

भूम तालुका दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असून येथील खवा, पेढे व इतर दुग्धजन्य पदार्थांना राज्यासह देशातील विविध भागांत मोठी मागणी आहे. अनेक धार्मिक स्थळांवरही येथील दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाते. मात्र, काही ठिकाणी दुधाची गुणवत्ता कृत्रिमरीत्या वाढविण्यासाठी किंवा उत्पादनाचे प्रमाण वाढविण्यासाठी दूध पावडरचा वापर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या.

तज्ज्ञांच्या मते, भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आरोग्यावर विशेषतः लहान मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवायांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याच मोहिमेअंतर्गत भूम येथील ही कारवाई करण्यात आली.

या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

तुफान पावसाने अंबरनाथ जलमय; घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल

Next Post

निसर्गाचे तांडव; धैर्य हरवू नका, बळीराजा पुन्हा उभा राहील!

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
7
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
214
Next Post

निसर्गाचे तांडव; धैर्य हरवू नका, बळीराजा पुन्हा उभा राहील!

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In