• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्युत पारेषण प्रकल्पास कोडीत खुर्द ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

पुरंदर | प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द येथे प्रस्तावित विद्युत पारेषण प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, शासनाने हा प्रकल्प सक्तीने राबविण्याचा प्रयत्न केल्यास तालुका, जिल्हा आणि आवश्यक असल्यास दिल्लीतील जंतरमंतर येथेही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी कोडीत खुर्द ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेऊन प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केला आहे. तसेच जिल्हाधिकारी, पुणे, तहसीलदार, पुरंदर आणि संबंधित विभागाकडे निवेदने सादर करून ग्रामस्थांना विस्थापित करणारा हा प्रकल्प नको असल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

मात्र, २ जुलै रोजी हा प्रकल्प मंजूर झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. यानंतर ५ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांची बैठक घेऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट भूमिका घेत, “ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा प्रकल्प आमच्यावर लादण्याचा प्रयत्न झाल्यास पुरंदर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आवश्यक असल्यास दिल्लीतील जंतरमंतर मैदानावरही आंदोलन करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला.

तसेच पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सर्व राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. भविष्यात या लढ्यात साथ देणाऱ्यांनाच ग्रामस्थ सहकार्य करतील, अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.

या बैठकीस सरपंच छाया खैरे, माजी सरपंच विशाल कांबळे, उपसरपंच बेबी खैरे, श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भैय्यासाहेब खैरे, माजी सरपंच निलेश तळेकर, माजी सरपंच प्रदीप खैरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहन खैरे यांच्यासह विविध ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Purandar Gaikwad
Previous Post

आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिनाचे महत्त्व

Next Post

तुफान पावसाने अंबरनाथ जलमय; घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post

तुफान पावसाने अंबरनाथ जलमय; घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In