• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लेबर कॉलनी येथील पोलीस वसाहतीची पोलीस अधीक्षकांची पाहणी जीर्ण क्वार्टर्सच्या जागी नवीन सुसज्ज इमारती उभारण्याचा निर्णय; अवैध प्रकारांवर कडक कारवाईचे निर्देश.

by
February 28, 2026
in Blog
0
लेबर कॉलनी येथील पोलीस वसाहतीची पोलीस अधीक्षकांची पाहणी जीर्ण क्वार्टर्सच्या जागी नवीन सुसज्ज इमारती उभारण्याचा निर्णय; अवैध प्रकारांवर कडक कारवाईचे निर्देश.
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर प्रेस नोट

लातूर प्रतिनिधी

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

दिनांक : 28 फेब्रुवारी 2026 लातूर जिल्ह्यात पोलीस दलाच्या पायाभूत सुविधा सुधारण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर पोलीस प्रशासन विशेष भर देत आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी लातूर शहरातील लेबर कॉलनी परिसरातील पोलीस वसाहतीस भेट देऊन सविस्तर पाहणी केली.

सदर पोलीस वसाहतीमध्ये यापूर्वी पोलिसांसाठी एकूण 76 निवासी सदनिका (क्वार्टर्स) बांधण्यात आल्या होत्या. मात्र कालांतराने या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत गेल्या असून सध्या त्यापैकी फक्त 8 सदनिका वापरात आहेत. उर्वरित क्वार्टर्सची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असून काही ठिकाणी संरचना धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.

पाहणीदरम्यान असेही आढळून आले की, त्या परिसरात पुरेशी वीज व्यवस्था नाही, सुरक्षा भिंत नाही तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसराचा गैरफायदा घेत काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक तेथे आडोशाला बसून नशापाणी व इतर अवैध प्रकार करत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून समोर येत होत्या. यामुळे परिसरातील रहिवाशांना अनेक अडचणी व असुरक्षिततेची भावना निर्माण होत होती.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सदर ठिकाणची सद्यस्थिती लक्षात घेता जुने व जीर्ण क्वार्टर्स पाडून त्या ठिकाणी नवीन, आधुनिक व सुसज्ज पोलीस निवासी इमारती उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे भविष्यात पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित व चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तसेच परिसरात असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पोलीस ठाणे विवेकानंद येथील पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना सदर परिसरात गस्त वाढविणे, अवैध धंदे, नशापाणी तसेच गोंधळ करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनीही परिसरातील समस्या मांडत पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले.

पोलीस प्रशासनाकडून परिसर स्वच्छ ठेवणे, सुरक्षित वातावरण निर्माण करणे व असामाजिक प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे आश्वासन देण्यात आले.

लातूर जिल्हा पोलीस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता पोलीस कर्मचारी व नागरिक दोघांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठीही प्रयत्नशील आहे. लेबर कॉलनी येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाच्या निर्णयामुळे परिसरातील नागरिक व पोलीस कर्मचारी यांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

Tags: ShareTaje batyma
Previous Post

भुसावळ हादरले ! सिमेंटची कुंडी डोक्यात घालून तरुणाची निर्घृण हत्या

Next Post

ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्या

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
3
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
3
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
10
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
16
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
6
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
210
Next Post
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न मांडताना-संजना जाधव

ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्या

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In