फुलंब्री तालुकयातील पेंडगाव येथील मयत कृष्णा धनाजी व्यवहारे वय 39 वर्षे रा.पेंडगाव ता.फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर, यांनी 2.30 दरमयान राहत्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली .
सविस्तर माहीती की कृष्णा धनाजी व्यवहारे वय 39 यांनी दिनांक 27/9/ 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,व आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहलेली आहे त्यामध्ये मुलांचे शिक्षण करता येत नाही व मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे असे चिठ्ठी मध्ये नमूद आहे त्यास उपचार करता ग्रामीण रुग्णालय फुलंब्री येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले आहे, त्यानंतर त्याचे pm झाल्यानंतर अंत्यविधी पेंडगाव येथे करण्यात आलेला होते मयताची पश्चात पत्नी 3 मुली 1 मुलगा असा परिवार आहे, पुढील तपास वडोदबाजार पोलीस स्टेशन करीत आहे .
Discussion about this post