• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गडचिरोलीतील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ११ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा –

by
March 5, 2026
in Blog
0
0
SHARES
97
VIEWS
Ad 1

काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी

*नितेश गट्टीवार*
गडचिरोली( चामोर्शी):दि.५मार्च–
जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथील बालरोग विभागात डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांची बालिका वंशिका साजन लेनगुरे (रा.दिभना) हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

या घटनेची माहिती मिळताच कांग्रेस कमेठी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे  यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली तसेच संबंधित डॉक्टरांना जाब विचारत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, उपचार सुरू असताना सदर बालिका सुमारे दोन तासांपूर्वी पर्यंत बरी व स्थिर स्थितीत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन तासांपूर्वीपर्यंत बरी असलेली बालिका अचानक कशी काय दगावली, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. जिल्हा महिला व बाल रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात जर अशा प्रकारे निष्काळजीपणा होत असेल आणि निरपराध बालकांचे जीव जात असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.

गडचिरोली हा आदिवासी व दुर्गम जिल्हा असून येथील गरीब नागरिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयांवर अवलंबून असतात. मात्र डॉक्टरांची कमतरता, अपुरी वैद्यकीय साधनसामग्री, तसेच काही ठिकाणी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची निष्काळजी वृत्ती यामुळे रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार मिळत नाहीत. यामुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सदर घटनेत दोन तासांपूर्वीपर्यंत बालिका बरी असल्याचे सांगण्यात येत असताना अचानक तिचा मृत्यू कसा झाला, याची सखोल चौकशी करून खरे कारण जनतेसमोर आणावे. तसेच या प्रकरणात जर कोणत्याही डॉक्टर किंवा संबंधित अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा आढळून आला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली.
तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तात्काळ आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, रिक्त असलेल्या डॉक्टरांच्या जागा त्वरित भराव्यात, तसेच रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळतील यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.

जर अशा प्रकारच्या घटना पुढेही घडत राहिल्या आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर याविरोधात तीव्र निषेध नोंदवून मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे. गरीब जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाला माफी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड,नंदुजी कुमरे,धनराज जेंगठे, अण्णाजी जेंगठे, विलास जेंगठे, साजन लेनगुरे, हिवराज गुरनुले, दामोदर उईके, विलास गावतुरे, छगन लेनगुरे, सोमेंद्र गावतुरे, शेषराव मेश्राम, देविदास जेंगठे, गणेश गेडाम, सुरेश जेंगठे, सुभाष गुरनुले सह उपस्थित होते.

Previous Post

किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक व्याख्याण्याचे आयोजन साने गुरुजी विद्यालयात संपन्न…..

Next Post

*सुधागुडम येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद*

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
37
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

*सुधागुडम येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद*

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In