• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

Pratik Tidke by Pratik Tidke
September 13, 2026
in Blog
0
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळास लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करणार नाहीत;असा निर्णय…..

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर.

कुरुंदवाड :-येथील शहरातील गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकामध्ये न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच काढाव्यात. गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केले.
कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्व नगरसेवक व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डांगे यांनी हे आवाहन केले.पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी डांगे म्हणाले की, डीजेपासून मुक्त होण्याचे पाऊल पर्यावरण तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवासाठी काही गणेश मंडळांनी डीजे मालकांकडे आधीच संचकार देऊन ठरवाठरवी केली आहे, तर पारंपरिक वाद्यांच्या पथकांचेही इतर ठिकाणी नियोजन झाल्याने ऐनवेळी ते वाद्य उपलब्ध होऊ शकत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या मिरवणुका वाजत गाजत व्हाव्यात, अशी भक्तांची अपेक्षा असल्याने प्रशासनाने यंदाच्या वर्षापुरती नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.मात्र, गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच ध्वनी प्रदूषणासह प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही डांगे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक पाटील म्हणाले गणेश मंडळांना न्यायालय व प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे मंडळ प्रमुखांनी याची गांभीर्याने दक्षता घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला.
बैठकीत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनीही मंडळांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच आगमन व विसर्जन मिरवणुका काढाव्यात तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवावेत,असा निर्णय घेतला आहे. कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास लोकप्रतिनिधी त्यात कदापि हस्तक्षेप करणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.
तसेच, भविष्यात कुरुंदवाड शहर डीजेमुक्त करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधीचा पुढाकार असणार असल्याची घोषणा केली. यावेळी सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.

Previous Post

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

Next Post

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

3
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
4
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
15
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
2
ठाणे ते अडावळे बुद्रुक थेट बससेवा आजपासून; खोपट बसस्थानकावर रात्री ११ वाजता उद्घाटन
Blog

ठाणे ते अडावळे बुद्रुक थेट बससेवा आजपासून; खोपट बसस्थानकावर रात्री ११ वाजता उद्घाटन

September 13, 2026
0
Next Post
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In