• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 15, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

पेण : महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात होताच कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची मोठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात रायगड जिल्ह्यातील पेण, खोपोली, खालापूर, पाली, नागोठणे, पोलादपूर, महाड, रोहा तसेच रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे यांनी जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष सूचना व आदेश दिले आहेत.

गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष दक्षतेने कर्तव्य बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध मार्गांवर पोलीस कर्मचारी भररस्त्यात वाहनांच्या गर्दीमध्ये उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वाहतूक व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

पेण तालुक्यात विशेष उपाययोजना

पेण तालुका हे गणेशोत्सवासाठी विशेष प्रसिद्ध असून, गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात कारखाने असल्याने मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून गणेशभक्त व मूर्ती खरेदी करणारे नागरिक पेणमध्ये मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पेण शहर व तालुक्यात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढते.

या पार्श्वभूमीवर पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने आवश्यक सूचना दिल्या असून, विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये तसेच अपघात व संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

पेण पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांना भेटी; भक्तिभावाने श्रीगणेशाचे दर्शन

दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. यानिमित्ताने पत्रकार प्रदीप रामचंद्र सताणे यांनी पेण शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

यामध्ये पेण नगरपरिषद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच पेण रिक्षा चालक-मालक संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे त्यांनी भक्तिभावाने श्रीगणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर पेण पोलीस ठाणे येथे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही त्यांनी भेट दिली.

पेण पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले, पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी यांच्या उपस्थितीत श्रीगणेशाचे दर्शन घेण्यात आले. यावेळी पत्रकार प्रदीप रामचंद्र सताणे यांनी पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले यांना तसेच पेण पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत, सर्व पोलीस बांधवांना पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Tags: Pradip Satane
Previous Post

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

Next Post

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
0
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
0
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
0
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Next Post

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In